-
विधानसभेत राज्य सरकारच्या गुरुवारी होणाऱ्या बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रात्री स्पष्ट नकार दिला.
-
शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यापुढे प्रलंबित असलेल्या याचिकांवर निर्णय होईपर्यंत बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात यावी, अशी शिवसेनेकडून करण्यात आलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
-
न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला.
-
महाराष्ट्राला लाभलेले आतापर्यंत मुख्यमंत्री कोण होते आणि त्यांचा कार्यकाळ किती होता जाणून घ्या…
-
१. यशवंतराव चव्हाण
कार्यकाळ – १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
२. मारोतराव कन्नमवार
कार्यकाळ – २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
३. वसंतराव नाईक
कार्यकाळ – ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
४. शंकरराव चव्हाण
कार्यकाळ – २१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
५. वसंतदादा पाटील
कार्यकाळ – १७ मे १९७७ ते १८ जुलै १९७८
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
६. शरद पवार
कार्यकाळ – १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०
पार्टी – पुरोगामी लोकशाही दल -
७. अब्दुल रहमान अंतुले
कार्यकाळ – ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
८. बाबासाहेब भोसले
कार्यकाळ – २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
९. वसंतदादा पाटील
कार्यकाळ – २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१०. शिवाजीराव पाटील
कार्यकाळ – ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
११. शंकरराव चव्हाण
कार्यकाळ – १२ मार्च १९८६ ते २५ जून १९८८
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१२. शरद पवार
कार्यकाळ – २६ जून १९८८ तै २५ जून १९९१
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१३. सुधाकरराव नाईक
कार्यकाळ – २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१४. शरद पवार
कार्यकाळ – ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१५. मनोहर जोशी
कार्यकाळ – १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९
पार्टी – शिवसेना -
१६. नारायण राणे
कार्यकाळ – १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९
पार्टी – शिवसेना -
१७. विलासराव देशमुख
कार्यकाळ – १८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१८. सुशीलकुमार शिंदे
कार्यकाळ – १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
१९. विलासराव देशमुख
कार्यकाळ – १ नोव्हेंबर २००४ ते ५ डिसेंबर २००८
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
२०. अशोक चव्हाण
कार्यकाळ – ५ डिसेंबर २००८ ते ९ नोव्हेंबर २०१०
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
२१. पृथ्वीराज चव्हाण
कार्यकाळ – १० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४
पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -
२२. देवेंद्र फडणवीस
कार्यकाळ – ३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९
पार्टी – भारतीय जनता पार्टी -
२३. देवेंद्र फडणवीस
कार्यकाळ – २३ नोव्हेंबर २०१९ ते २८ नोव्हेंबर २०१९
पार्टी – भारतीय जनता पार्टी -
२४. उद्धव ठाकरे
कार्यकाळ – २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२
पार्टी – शिवसेना -
भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील असे जाहीर केले आहे.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ