-
राज्यातील विधीमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. शिंदे-फडणवीस सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे.
-
शिवसेनेचे ३९ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात असल्याचा दावा त्यांनी केला होता.
-
आता शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात गेल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (फोटो : ANI)
-
शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
संतोष बांगर हे कालपर्यंत शिवसेनेसोबत एकनिष्ठ होते. विशेष म्हणजे त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान केले होते
-
आज संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि समर्थक आमदारांसोबत विधानभवनात प्रवेश केल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
शिवसेनेतील बंडखोरीनंतर हिंगोलीत काढण्यात आलेल्या मोर्च्यात संतोष बांगर सहभागी झाले होते.
-
बंडखोरा आमदारांविरोधात भूमिका घेतल्यामुळे बांगर यांचे कौतुकही झाले होते. याशिवाय त्यांची मिरवणूकही काढण्यात आली होती.
-
या मिरवणूकीतील त्यांच्या भाषणाची तुफान चर्चा रंगली होती. यावेळी संतोष बांगर रडले होते.
-
“तुम्ही पुन्हा पक्षात या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील “,असे आवाहन त्यांनी शिंदे समर्थक आमदारांना केले होते.
-
“निवडणुकीत विजयी झाल्यानंतर माझी एवढी मोठी मिरवणूक काढली नव्हती, ती आज काढण्यात आली. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठिशी कायम असणार “, असं ते म्हणाले होते.
-
संतोष बांगर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.
-
बांगर हे शिंदे गटात गेल्याने शिंदे गटातील आमदारांची संख्या ४० वर पोहोचली आहे. तर उद्धव ठाकरे गटातील आमदारांची संख्या १५ वर आली आहे.
-
(सर्व फोटो : संतोष बांगर/ इन्स्टाग्राम)
गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’