-
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपद आलं आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच ते आपल्या बालेकिल्ल्यात दाखल झाले. (Express Photo: Dhananjay Khedkar )
-
पक्षासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच नागपुरात स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. (Express Photo: Dhananjay Khedkar )
-
यावेळी फडणवीसांनी याच प्रेमामुळे आपण यशस्वी आहोत अशी भावनाही व्यक्त केली. (Express Photo: Dhananjay Khedkar )
-
देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर विमानतळावर सकाळी ११.३० वाजता आगमन झालं. (Express Photo: Dhananjay Khedkar )
-
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासहित काही इतर नेतेही उपस्थित होते. (Express Photo: Dhananjay Khedkar )
-
अमृता फडणवीसही यावेळी उपस्थित होत्या. (Express Photo: Dhananjay Khedkar )
-
यावेळी ढोल ताशाच्या निनादात त्यांचं स्वागत करण्यात आलं. (Express Photo: Dhananjay Khedkar )
-
यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (Express Photo: Dhananjay Khedkar )
-
विमानतळावर स्वागत केल्यानंतर मिरवणुकीचे हॉटेल प्राइड चौकात स्वागत करण्यात आले. यावेळी फटाकांची आतिषबाजी करण्यात आली. (Express Photo: Dhananjay Khedkar )
-
भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते स्कूटर मिरवणूक काढत सहभागी झाले होते. (Express Photo: Dhananjay Khedkar )
-
मिरवणूक मार्गावर देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनाचे फलक लागले आहेत. यामध्ये फडणवीसांनी पक्षाचा आदेश पाळत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याबद्दल कौतुक करण्यात आलं आहे. (Express Photo)
-
यातील काही फलकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (Express Photo)
-
फडणवीसांचा उल्लेख महाराष्ट्राचे वाघ असा एका बॅनरवर करण्यात आला. (Express Photo)
-
यामधील एका बॅनरवर प्रिय देवेंद्र, तू कोणत्या मातीचा बनला आहेस यार, आम्ही सर्व तुमच्यासमोर खुजे आहोत असं सांगत कौतुक करण्यात आलं आहे. (Express Photo)
-
एका बॅनरवर फडणवीसांचा उल्लेख देवमाणूस असा करण्यात आला आहे.
-
फडणवीसांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की, “नागपूरकरांना आमच्यावर नेहमीच प्रेम केलं आहे. आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आलो असता प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक जमले आहेत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आज मी जे काही आहे ते त्यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आहे. आपल्यावर एक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे याची मला जाणीव आहे. ती योग्य प्रकारे पार पडण्याचा संकल्प आहे”. (Express Photo: Dhananjay Khedkar )
-
“सुप्रीम कोर्टात आम्ही योग्य ती बाजू मांडू. आम्ही योग्य काम केलं असल्याने योग्य निकाल येईल. पण आता न्यायालयावर टिप्पणी करणं अयोग्य ठरेल,” असं सांगत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं. (Express Photo: Dhananjay Khedkar )
-
लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करु असंही ते म्हणाले. (Express Photo: Dhananjay Khedkar )
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल