-
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
-
एकनाथ शिंदे यांनी एकीकडे प्रशासकीय बैठकांचा सपाटा लावला आहे, तर दुसरीकडे महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांनाही भेटी देण्यास सुरुवात केली.
-
मंगळवारी (५ जुलै) मुख्यमंत्र्यांनी दादर येथील संयुक्त महाराष्ट्र स्मारकाला भेट दिली.
-
यावेळी त्यांनी या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या योद्ध्यांना विनम्रपणे अभिवादन केले.
-
यावेळी त्यांनी स्मारकातील प्रदर्शनही पाहिलं.
-
एकनाथ शिंदे यांनी वेळेत वेळ काढून स्मारकातील भिंतीफलक पाहिले.
-
संयुक्त महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक घटनांच्या नोंदी करून त्या नागरिकांना समजण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत.
-
या स्मारकातून मराठी बाणा आणि मराठी संस्कृतीचं जतन करण्यात आलं आहे.
-
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभादेवी येथील श्री सिध्दीविनायकाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. (सर्व फोटो सौजन्य – एकनाथ शिंदे ट्विटर)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ