-
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. शिंजो आबे प्रचार करत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या हा हल्लेखोर नेमका कोण आहे?
-
जपानमधील वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या ४१ वर्षीय स्थानिक व्यक्तीला अटक केली आहे. त्याचं नाव Tetsuya Yamagami आहे.
-
४१ वर्षीय हल्लेखोर हा निवृत्त लष्करी अधिकारी आहे.
-
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने गोळी झाडली तेव्हा तो शिंजो आबे यांच्या मागेच १० फूट अंतरावर उभा होता.
-
भाषण सुरु असतानाच गोळी लागल्यानंतर शिंजो आबे खाली कोसळले. यानंतर पोलिसांनी हल्लोखोराला तिथेच पकडलं.
-
रिपोर्टनुसार, हल्लेखोराने शॉर्टगनचा वापर केला आहे.
-
त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
शिंजो आबे पश्चिम जपानमधील नारा शहरात भाषण करत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ते खाली कोसळले.
-
ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीपूर्वी एका सभेला संबोधित करत होते.ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता (भारतीय वेळेनुसार ८.२९ वाजता) घडली.
-
गोळी लागल्याने आबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या प्रकृती गंभीर आहे.
-
(सर्व फोटो ट्विटर आणि व्हायरल व्हिडीओवरुन साभार)
Crime News : १७ वर्षीय बलात्कार पीडितेवर पोलिसाने पुन्हा केला बलात्कार, खाकी वर्दीला लाज आणणारी घटना कुठे घडली?