-
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरप्रीत कौरसोबत दुसरे लग्न केले. घटस्फोटानंतर सात वर्षांनी मान यांनी दुसरे लग्न केले.
-
याआधी भगवंत मान यांचे लग्न इंद्रप्रीत कौरशी झाले होते, ज्यांच्यापासून त्यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला होता.
-
भगवंत मान यांची दुसरी पत्नी गुरप्रीत कौर डॉक्टर आहेत. त्या मान कुटुंबीयांच्या निकटवर्ती असल्याचं बोललं जातं.
-
अत्यंत साध्या पद्धतीने भगवंत मान यांनी लग्न केले. नातेवाईक आणि ठराविक लोकांच्या उपस्थित हे लग्न पार पडले.
-
आईच्या इच्छेसाठी भगवंत मान यांनी दुसरे लग्न केले असल्याचे सांगितले जात आहे.
-
भगवंत मान यांनी दोन लग्ने केली आहेत पण पंजाबचे अनेक मंत्री आणि आमदार अजूनही अविवाहित आहेत.
-
पंजाबचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री गुरमीत सिंग मीत हरे हे अजूनही बॅचलर आहेत पण नुकतेच त्यांनी पुढच्या वर्षी लग्न करू शकतो असे सांगितले आहे.
-
पंजाबच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री, अनमोल गगन मान .या देखील अविवाहित आहेत. त्या पंजाबी गायिका देखील आहे अनमोल गगन यांनी आत्तापर्यंत अनेक गाणी गायली आहेत.
-
तुरुंग आणि खाण मंत्री हरजोतसिंग बैंस हे देखील अद्याप बॅचलर आहेत. पंजाबच्या इतिहासातील ते सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री ठरले आहेत.
-
नरिंदर कौर भाराज यांची गणना पंजाबच्या कुशाग्र आमदारांमध्ये केली जाते. त्या पंजाबच्या सर्वात तरुण आमदार आहेत. त्याही अविवाहित आहेत.
-
पंजाबमधील बाघा पुराणातील आमदार अमृतपाल सिंह सुखनंद यांचेही अद्याप लग्न झालेले नाही.
-
नरिंदर पाल सिंह पंजाबच्या फाजिल्का मतदारसंघातून आमदार झाले आहेत. तेही अविवाहित आहेत.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं