-
मागील काही दिवसांपूर्वी राज्यात मोठे सत्तानाट्य रंगले. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
राज्यात सत्तांतरानंतर शिंदे गट- भाजपाच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे.
-
असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत.
-
दिल्लीमध्ये फडणवीस, शिंदे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.
-
या भेटीमध्ये शिंदे आणि फडणवीस यांची अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे-फडणवीस अॅटर्नी जनरल तुषार मेहतांनाही भेटणार आहेत. या भेटीत शिंदे गट आणि शवसेना यांच्यात सुरु असलेल्या लढाईविषयी कायदेशीर बाबींवर चर्चा केली जाऊ शकते.
-
महाराष्ट्र सरकारमध्ये भाजपाचा आणि शिंदे गटाचा किती वाटा असेल हे या दौऱ्यात ठरवले जाणार आहे. यावेळी शिंदे आणि फडणवीस यांनी रामनाथ कोविंद, नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह यांना विठ्ठल-रखुमाईंची मूर्ती भेट दिली.
-
राज्यात शिंदे गट-भाजपा यांचे सरकार ज्यात स्थापन झालेले असले तरी शिवसेना आणि बंडखोर आमदार यांच्यातील लढाई कोर्टापर्यंत पोहोचली आहे
-
बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, राज्यपालांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी दिलेले आमंत्रण, शिंदे-फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव याबाबत ११ जुलैनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
-
शिवसेनेचा गटनेता कोण आणि मूळ शिवसेना कोणाची, या मुद्दयावरील सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर शिंदे गटाचे भवितव्य अवलंबून आहे. ११ जुलै रोजी न्यायालयातर्फे जो निर्णय देण्यात येईल. त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल