-
जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांची नारामध्ये संसदीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रचारसभेत बोलत असतानाच आबे यांच्यावर मागून गोळीबार केला असल्याचे जपानी माध्यमांनी सांगितले.
-
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची १४ एप्रिल १८६५ रोजी हत्या करण्यात आली होती.वॉशिंग्टन डीसीच्या फोर्ड थिएटरमध्ये नाटक पाहत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
-
इटलीचे माजी राष्ट्राध्यक्ष अल्दो मोरो यांची ९ मे १९७८ रोजी डाव्या विचारसरणीच्या कट्टर गटाने हत्या केली होती. मोरो यांना या गटाने 2 महिने ताब्यात ठेवले आणि नंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.
-
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टोडिसेंबर २००७ मध्ये रावळपिंडी येथील एका निवडणूक रॅलीत आत्मघाती बॉम्बस्फोटात मारल्या गेल्या होत्या. भुट्टो १९८८ ते १९९० तसेच १९९३ ते १९९६ काळात पाकिस्तानाच्या पंतप्रधान होत्या.
-
इस्रायली पंतप्रधान यित्झाक राबिन यांची ४ नोव्हेंबर १९९५ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. इगल अमीर नावाच्या उजव्या विचारसणीच्या व्यक्तीने यित्झाक यांची हत्या केली होती.
-
३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. भारत-पाकिस्तान फाळणीसाठी गांधींजींना जबाबदार धरत नथुराम गोडसेने त्यांच्या छातीमध्ये गोळ्या झाडल्या होत्या.
-
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. १९८४ साली पंजाबच्या सुवर्ण मंदिरात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारमुळेच इंदिरा गांधी यांची हत्या केली असल्याचे सांगण्यात येते.
-
युएसएचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची २२ नोव्हेंबर १९६३ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. केनेडी यांच्या हत्येमागे मोठा कट असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती, मात्र ते सिद्ध करण्यात आले नाही. केनेडी यांची हत्या करणाऱ्या ली हार्वे ओस्वाल्डचीही एका नाईट कल्बच्या मालकाने गोळ्या घालून हत्या केली.
-
भारतातील कर्नाल येथे जन्मलेले, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान लियाकत अली खान यांची १६ ऑक्टोबर १९५१ रोजी रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली होती. रावळपिंडीतील कंपनी बाग परिसरात भाषण देताना सईद अकबर खान बबराकजई नामक व्यक्तीने त्यांना गोळी मारली होती.
-
१९६८ मध्ये मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांची हत्या करण्यात आली होती. मार्टिन हाॅटेल रुमच्या बाल्कनीत उभे असताना जेम्स अर्ल रे या व्यक्तीने त्यांना गोळी मारली होती. यूएसएमध्ये आफ्रिकन-अमेरिकन लोकांचे कायदेशीर विलग्नता दूर करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
-
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची मे १९९१ मध्ये हत्या करण्यात आली होती. श्रीलंकेच्या फुटीर संघटनेची थेनमोझी राजरत्नमने स्वत:ला बॉम्ब लावून आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात राजीव गांधी यांच्यासोबत १४ जणांचा मृत्यू झाला होता.
-
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मेरी-फ्राँकोइस सॅडी कार्नोट यांच्यावर 24 जून 1894 रोजी लियोन येथे भाषण देताना हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी कार्नोट यांचा मृत्यू झाला होता.
-
पंजाबचा गायक तसेच राजकीय नेता सिद्धू मूसवाला यांची २९ मे २०२२ रोजी मानसा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या हात असल्याची पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे. या घटनेचा तपास पंजाब पोलीस करत आहेत.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”