-
विकेंड असल्याने लोणावळ्यात वर्षा विहाराचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. (सर्व फोटो – कृष्णा पांचाळ)
-
भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट येथे वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले.
-
जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे.
-
त्यानंतर, भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याची बातमी पसरताच लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी झाली.
-
टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट येथे धुक्याची चादर पसरली त्याचा आल्हाददायी अनुभव पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह अनुभवला आहे.
-
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे.
-
रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.
-
मक्याचं कणीस, कांदा भजी, चीज भजी, स्वीट कॉर्न चा आस्वाद पर्यटक घेत होते.
-
अगदी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत.
-
दोन वर्षे झाली करोनामुळं पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी होती. घरात बसून नागरिक कंटाळले होते.
-
त्यामुळं यावर्षीचा पावसाळा हा पर्यटकांसाठी विशेष असल्याचं पर्यटकांनी सांगितलं आहे.
-
दररोज पाऊस सुरू असल्याने लोणावळा अक्षरशा जलमय झालेला दिसत आहे
-
पाण्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केल्याचे जागोजागी दिसत आहे.
-
सहयाद्रीच्या डोंगर दरीतून धबधबे वाहू लागले आहेत.
-
भुशी धरणावर गर्दी असल्याने अनेक पर्यटक छोट्या छोट्या धबधब्याखाली भिजत वर्षाविहाराचा ममसोक्त आनंद घेतला.
-
अनेक तरुण पर्यटक मद्यपान करून लोणावळा, भुशी डॅम, टायगर पॉइण्ट, लायन्स पॉईंट इथे येतात त्यांच्यावर लोणावळा पोलिसांनी लक्ष ठेवत कारवाई करायला हवी.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”