-
गुजरात एटीएस आणि पंजाब पोलीस दलातील पोलीस उपनिरिक्षकांनी मुद्रा बंदरावरील एका कंटेरनमध्ये संशयास्पद वस्तू असल्याच्या शक्यतेने केलेल्या छापेमारीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती गुजरात पोलिसांचे डीजीपी आशिष भाटिया यांनी सांगितलं आहे.
-
हा सर्व माल १३ मे रोजी मुंद्रा बंदरामध्ये दाखल झाल्याची माहिती डीजीपी आशिष भाटिया यांनी दिली आहे.
-
संयुक्त अरब अमिरातीमधील अजमान फ्री झोनमधून हा माल मुंद्रा बंदरामध्ये आणण्यात आल्याची माहिती समोर आलीय. हा माल पंजाबमध्ये पाठवण्यात येणार होता.
-
या कंटेरनमधील अमली पदार्थ लपवण्यासाठी कार्डबोर्डचे पाईप वापरण्यात आले होते. हे पाईप कार्डबोर्डचे वाटू नयेत म्हणून त्यावर निळ्या रंगाचं प्लास्टिक लावून हेरॉइन लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असं पोलिसांनी सांगितलंय.
-
पोलीस अधिकाऱ्यांनी हे पाईप नीट तपासले असता त्यांना हे पाईप प्लास्टिकचे नसून कार्डबोर्डचे असल्याचं समजलं. या पाईपच्या दोन्ही बाजूंना प्लास्टिकचे बोळे कोंबण्यात आल्याने यामध्ये काहीतरी लपवल्याची शंका पोलिसांना आली. त्यानंतर त्यांनी ते बोळे काढले असता या पाईपमधून हेरॉइनची तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली.
-
गुजरातमधील याच बंदरावरुन १५ सप्टेंबर २०२१ रोजी तीन हजार किलो अमली पदार्थ पकडले गेले होते. त्यावेळीही हे बंदर आणि या बंदराची मालकी असणारा अदानी समूह चांगलाच चर्चेत आला होता.
