-
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना मंगळवारी केले.
-
इतर पक्षांमध्ये फाटाफूट झाली, पण राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही याबद्दलही पवार यांनी समाधान व्यक्त केले.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीची सभा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.
-
या वेळी बोलताना पवार यांनी संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम सध्या भाजपा करीत असल्याचा आरोप केला.
-
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने सत्तेत आलेल्या लोकांना दूर करीत भाजपाच्या मंडळींनी सत्ता हाती घेतली, असंही यावेळेस पवार यांनी म्हटलं.
-
सत्ता नेहमी विकेंद्रित झाली पाहिजे तर ती अनेकांच्या हाती जाते. आता सारी सत्ता केंद्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं मत पवार यांनी व्यक्त केलं.
-
ईडी, सीबीआयचा काँग्रेस सरकारच्या काळात कधी गैरवापर झाला नव्हता. या यंत्रणा आता लोकांना कळल्या, असा टोला पवारांनी सध्या सत्तेत असणाऱ्या सरकारला लगावला.
-
सत्तेचा गैरवापर करून राजकीय दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप पवार यांनी राज्यातील सत्तांतरणाच्या पार्श्वभूमीवर केला.
-
या साऱ्याकडे जनतेचे लक्ष असते. जनता बोलत नाही तर निरीक्षण करीत असते, असं पवार म्हणाले.
-
आज ना उद्या ही सत्ता बरखास्त केल्याशिवाय ही जनता राहणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला.
-
यासंदर्भात त्यांनी आणीबाणीचा हवाला देत १९७७ मध्ये देशातील जनतेने इंदिरा गांधी यांचा पराभव केला होता ही आठवण पवार यांनी सांगितली.
-
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या मदतीने भाजपाने राज्यात घडवलेल्या सत्तांतरणाबद्दल बोलताना, “राज्यातील सत्ता परिवर्तन लोकांना आवडलेले नाही,” असे पवार यांनी नमूद केले. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल