-
एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्तास्थापन करीत मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे ३० जूनला स्वीकारली.
-
त्यानंतर बैठकांचा सपाटा आणि निर्णयांचा धडाका लावत तसेच दौरे करीत नव्या सरकाने आपल्या कामाची झलक दाखविण्यास सुरुवात केली.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोनच दिवसात मंत्रालयातून आपला कारभार सुरू केला.
-
फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या जुन्या बहुतांशी अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री कायार्लयात समाविष्ट करून घेतले आहे.
-
उपमुख्यमंत्री कायार्लयात सचिव म्हणून डॉ. श्रीकर परदेशी यांनी पदभार स्वीकारला.
-
तसेच आतापर्यंत १० अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत.
-
दैनंदिन बैठका, लोकांची निवेदने स्विकारणे ही कामे सुरू झाली.
-
देवेंद्र फडणवीस हे स्वत: मंत्रालयातील दालनात उपस्थित असतात.
-
यातूनच उपमुख्यमंत्र्याच्या कार्यालयात नेत्यांचा, लोकांचा राबता वाढून कार्यालय गजबलेले असते.
-
सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री सचिवालय मात्र अजूनही सुनेसुनेच आहे.
-
गेल्या आठवड्यात शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात विधिवत पदभारही स्वीकारला.
-
मात्र त्यानंतरही शिंदे यांचा कारभार शासकीय निवासस्थानातूनच सुरू आहे.
-
शिवाय मुख्यमंत्री सचिवालयात अद्याप सचिवांसह कोणाच्या नियुक्त्या न झाल्याने नेहमी गजबजणारे सचिवालय दोन आठवड्यांपासून रिकामेच दिसते.
-
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांनी मंत्रालयात येऊन पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली.
-
त्यानंतर बहुतेक बैठका या शासकीय निवासस्थानी किंवा सह्याद्री अतिथिगृहावर घेतल्या.
-
त्यानंतर दिल्ली, आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूर, ठाणे दौराही केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस / ट्विटर)

“माकडतोंड्या, बोबडा बोलतो…सूरजचा सिनेमा फ्लॉप करायचा ठरवलं होतं”, केदार शिंदेंचा ट्रोलर्सबाबत मोठा दावा, म्हणाले…