-
राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत वेगवेगळी विकासकामे तसेच योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली.
-
पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. (वित्त विभाग)
-
राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार आहे. (नगर विकास विभाग)
-
केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार आहे. (नगर विकास विभाग)
-
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेण्यात येणार आहे. (नगर विकास विभाग)
-
राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा. (ग्रामविकास विभाग)
-
अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार आहे.
-
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा होणार आहे. (ग्रामविकास विभाग)
-
बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.
-
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा होणार आहे. (पणन विभाग)
-
आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार आहेत. (सामान्य प्रशासन विभाग)
-
(सर्व फोटो सौजन्य : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस / ट्विटर)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”