-
सचिन तेंडूलकर हा ब्रिटीश बँड डायर स्ट्रेट्स आणि त्यांचा प्रमुख गिटार वादक आणि गायक मार्क नॉफ्लरचा चाहता आहे. स्कॉटलॅंडच्या सहलीवर असताना सचिनने दोघांनाही भेटण्याची संधी सोडली नाही. यावेळी त्याची पत्नी अंजली उपस्थित होती.
-
शहरी गर्दीतून दूर जात सचिन स्काटलॅंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.
-
स्कॉटलॅंडच्या निसर्गरम्य वातावरणात कॉफीचा आनंद घेताना सचिन तेंडूलकर
-
या सहलीदरम्यान सचिन तेंडूलकरने जवळच असलेल्या एका तलावालाही भेट दिली.
-
सचिनने यावेळी मार्क नॉफ्लरची देखील भेट घेतली.
-
‘स्कॉटिश हाईलँड्स अतिशय सुंदर आहेत. आराम करण्यासाठी, एक्सप्लोर करण्यासाठी आणि शहरी जीवनातून बाहेर पडण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे’, असे सचिनने म्हटले आहे.