-
अर्थजर्जर झालेल्या श्रीलंकेची स्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. येथील आंदोलक आक्रमक होत असून त्यांना रोखणं कठीण होत आहे. (सर्व फोटो-indianexpress.com वरून साभार)
-
एकीकडे देश आर्थिक संकटात सापडलेला असताना अध्यश्र गोताबया राजपक्षे यांनी पलायन केले आहे. ते मालवदीवमधून सिंगापूरला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
-
गोताबया राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला घेऊन आंदोलकांनी गोताबया यांचे शासकीय निवासस्थान ताब्यात घेतले होते. मात्र राजीनाम न देताच राजपक्षे यांनी पलायन केले आहे.
-
गोताबया राजपक्षे यांनी सुरक्षा दलाकडे एका विमानाची मागणी केली होती. राजपक्षे राष्ट्राध्यक्ष आणि सुरक्षा दलाचे प्रमुख असल्याने सैन्यानेही त्यांना हे विमान दिलं. त्यानंतर त्यांनी श्रीलंकेतून पलायन केलं आहे.
-
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबय राजपक्षे यांना आपल्या कुटुंबासह देशाबाहेर पळून जाण्यासाठी भारताने मदत केल्याचे आरोप भारतीय दुतावासाने फेटाळले आहेत. तसेच भारत श्रीलंकेच्या नागरिकांसोबत असल्याचं मत व्यक्त केलं.
-
गोताबया राजपक्षे यांच्या शासकीय निवासस्थानाचा ताबा आंदोलकांनी घेतला आहे. या निवासस्थानाच्या परिसरात हजारो नागरिक असून ते येथील सोफा, किचन, बेडरुमचा वापर करताना दिसत आहेत.
-
राजपक्षे यांच्या निवासस्थानाचा ताबा घेतल्यानंतर आंदोलक येतील सोफा, खुर्चीवर बसून टीव्ही पाहत आहेत.
-
तसेच आंदोलक अध्यक्षांच्या निवासस्थानमधील स्वयंपाकगृहाचाही उपयोग करताना दिसत आहेत. येथे आंदोलकांसाठी जेवण तयार केलं जातंय.
-
आंदोलकांनी राजपक्षे यांचे निवासस्थान ताब्यात घेतले असून त्याची तोडफोड करण्यात आल्याचंही दिसत आहे.
-
भिंतीवर ग्राफीटी तसेच घोषवाक्ये लिहून आमचे पैसे परत करा, अशी मागणी आंदोलक करत आहेत.
-
राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलक असून येथे आईसक्रीम विकणारेदेखील दाखल झाले आहेत.
-
तर दुसरीकडे राजपक्षे यांनी देशपलायन केल्यानंतर पंतप्रधान रनील विक्रमसिंघे येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवून पाहत आहेत. त्यांनी येथील लष्कर आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी जे जे गरजेचे आहे, ते सर्व करा, असे आदेश दिले आहेत.
-
मात्र आक्रमक आंदोलकांनी विक्रमसिंघे यांच्या शासकीय निवासस्थानामध्येही घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा दलाकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या.
-
सर्व पक्षांचं सरकार सत्तेवर आलं की राजपक्षे पदावरून बाजूला जातील, असे हंगामी अध्यक्ष रानील विक्रमसिंघे यांनी सांगितले आहे.
-
गोताबया राजपक्षे हे बुधवारी (१३ जुलै) अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी देशाबाहेर पलायन करून घटनेच्या अनुच्छेद ३७ (१) नुसार अध्यक्षपदाचा कार्यभार पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्याकडे सोपवला.
-
राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या निवासस्थान परिसरातील एक निर्मनुष्य रस्ता.
-
पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झालेले आंदोलक.
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई