-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
-
राज ठाकरे यांच्या दादरमधील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी हे दोन्ही नेते भेटले.
-
राज्यामध्ये सत्तापालट झाल्यानंतर फडणवीस आणि राज यांची ही पहिलीच भेट होती.
-
राज ठाकरेंना भेटण्यासाठी फडणवीस दुपारी १२ च्या सुमारास राज यांना भेटण्यासाठी ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले.
-
यावेळेस भगवी शाल देऊन फडणवीस यांचं स्वागत करण्यात आलं.
-
मनसेने हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारल्यापासून राज ठाकरेंना अनेक कार्यक्रमांमध्ये अशाप्रकारची भगवी शाल देऊनच स्वागत केलं जातं. तशाच पद्धतीची शाल आज फडणवीस यांना देण्यात आली.
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अन्य नेतेही यावेळेस उपस्थित होते.
-
भाजपाने राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना मंत्रीपद देण्याची ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली होती. ही शक्यता राज ठाकरेंनी फेटाळून लावली असताना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
-
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक करणारं पत्र त्यांना पाठवलं होतं.
-
राज ठाकरे हे वॉकिंग स्टीकच्या सहाय्याने चालत असल्याचं यावेळी दिसून आलं.
-
गेल्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हिपबोन शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचं भाजपाच्या गोटातून सांगितलं जात आहे.
-
शर्मिला ठाकरेंनी फडणवीस यांचे औक्षण केल्याचे फोटोही समोर आले आहेत. या वेळेस राज यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या.
-
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी फडणवीस यांचं औक्षण केलं.
-
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच घरी आल्याने त्यांचं औक्षण करण्यात आलं.
-
ठाकरे आणि फडणवीस यांचे राजकारणापलीकडचे घरोब्याचे संबंध आहेत.
-
काही महिन्यांपूर्वी राज हे नव्या घरात शिफ्ट झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस राज यांच्या भेटीसाठी नव्या घरी आले होते.
-
यावेळेस राज यांच्याबरोबरच मनसेच्या नेत्यांसोबतही फडणवीस यांनी संवाद साधला.
-
सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबई महानगर पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे या भेटीमध्ये बदलत्या राजकीय समीकरणांवर देखील चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीचं हिटमॅनकडून २ शब्दात कौतुक; रोहित शर्मा पोस्ट शेअर करत म्हणाला…