-
मागील अनेक दिवसांपासून इंधन तसेच घरगुती गॅस सिंलिंडरचे दर वाढत आहेत. महागाईदेखील चांगलीच वाढत आहे. या महागाईचा फटका गरीब तसेच मध्यमवर्गीयांना बसत आहे.
-
अशा परिस्थितीत केंद्र तसेच राज्य सरकारकडून नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय.
-
उत्तराखंड राज्य सरकारनेदेखील नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक विशेष योजना सुरु केली आहे.
-
या योजनेंतर्गत येथील स्थानिक नागरिकांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या पात्रतेसाठी सरकारने काही अटी घातलेल्या आहेत.
-
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर उत्तराखंडमधील नागरिकांना त्यांचे अंत्योदय शिधापत्रिका कार्ड (रेशन कार्ड) गॅस कार्डशी लिंक करावे लागणार आहे.
-
या प्रक्रियेला जुलै म्हणजेच या महिन्यात पूर्ण करावे लागणार आहे. या योजनेचा लाभ फक्त उत्तराखंड राज्यातील कायमस्वरुपी रहिवाशीच घेऊ शकतात.
-
या योजनेच्या अमंलबजावणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारकडून लवकरच अंत्योदय शिधापत्रिकांची यादी स्थानिक कॅस एजन्सीजना पाठविली जाणार आहे. त्यानंतर या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”