-
कल्याणमध्ये पुजेसाठी अगरबत्ती पेटवल्याने गॅस सिलेंडरच्या स्फोटाची घटना घडली. या स्फोटात एक ६५ वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजली आहे.
-
ही घटना डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात घडली. जखमीला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
हनुमंत मोरे असे जखमीचे नाव असून विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
-
डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर देवीचा पाडा परिसरात राहणारे हनुमंत मोरे रविवारी (१७ जुलै) पहाटे ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास उठले.
-
ते सकाळी अंघोळ करून देवपूजेसाठी अगरबत्ती पेटवण्यासाठी लायटर पेटवण्यासाठी गेले आणि घरातील सिलेंडरचा स्फोट झाला.
-
यावेळी घरात असलेले हनुमंत मोरे जवळपास ४० टक्के भाजले. स्फोटाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
-
स्फोट झाल्याची माहिती मोरे यांच्या मुलाला व पोलिसांना देत त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
-
यानंतर त्यांच्या मुलाला याची माहिती मिळताच त्यांनी वडिलांना मुंबईच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.
-
दुसरीकडे पहाटे झालेला हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटात घराचे पत्रे हवेत उडाले, तर स्वयंपाक घरातील बहुतांशी सामान जळाले.
-
या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. स्फोटाचं नेमकं कारण काय आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई