-
आज (१८ जुलै) राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आहे. ६ ऑगस्टला होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
-
भाजपाकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी जगदीप धनकड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-
जगदीप धनकड हे सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत.
-
त्यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थानमधील झुंझूनू जिल्ह्यात झाला.
-
चित्तोडगड येथील सैनिकी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जयपूरमधून भौतिकशास्त्रात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
-
धनकड हे पेशाने वकील असून राजस्थानच्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांनी काम केले आहे.
-
१९८९ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
-
१९८९ ते १९९१ या काळात जनता दल पक्षाकडून झुंझूनू मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडूण गेले होते.
-
१९९३-९८ या काळात धनकड राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष होते.
-
धनकड यांनी काही काळ काँग्रेसमध्येही काम केले आहे.
-
त्यानंतर कॉग्रेसला सोडचिठ्ठी देत २००३ साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
-
२०१९ साली त्यांना पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले.
-
देशाच्या १६व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी भाजपाकडून धनकड यांना उमेदवारी दिल्यामुळे याचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात आहेत.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस, जगदीप धनकड/ट्विटर )

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य