-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फ्री रेवडी’ संस्कृती देशाच्या विकासासाठी धोकादायक असल्याचं म्हणत मोफत योजना देणाऱ्यांवर टीका केली. यानंतर दिल्लीत मोफत वीज, पाणी, आरोग्य सेवा व शिक्षण देणाऱ्या सत्ताधारी आपने मोदींना प्रत्युत्तर दिलंय.
-
अरविंद केजरीवाल यांनी मी सुशिक्षित असून माझी पदवी खरी आहे, असं म्हणत मोदींना टोला लगावला.
-
तसेच इतक्या गोष्टी फ्री असूनही दिल्लीचा अर्थसंकल्प फायद्यात असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं. यासाठी त्यांनी कॅगच्या अहवालाचाही उल्लेख केला.
-
जो व्यक्ती स्वतःसाठी ८५०० कोटींचं विमान, १२ कोटीची गाडी, १० लाख रुपयांचा सूट घेतात ते केजरीवालांना मोफत योजनेवर प्रश्न विचारत आहेत, अशीही टीका आपने केली.
-
आपल्या ट्वीटमध्ये आपने मोदींवर दीड लाख रुपयांचा चष्मा, १ लाख ३० हजाराचा पेन आणि लाखो रुपयांच्या मशरुम खालल्याचाही आरोप केला.
-
आपने मोदींवर त्यांच्या उद्योगपती मित्रांचं मागील ७ वर्षात ११ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केल्याचा आरोप केला.
-
तसेच मोदी जनतेच्या कराचा पैसा मित्रांना कर्जमाफी देऊन करत आहेत आणि जनतेला दिलेल्या सुविधांना मोफत रेवडी म्हणत असल्याचंही आपने म्हटलं.
-
मोदींना २००५ मध्ये अमेरिकेने व्हिसा नाकारला तेव्हा संपूर्ण देश मोदींमागे होता, मात्र तेच मोदी आज केजरीवालांना सिंगापूरला जाण्यास परवानगी देत नाहीत, असा आरोप आपने केला.
-
तसेच मोदींना सिंगापूरमध्ये त्यांच्या बनावट मॉडेलचा भांडाफोड होण्याची भीती वाटत आहे, असा आरोप आपने केला.
-
मोदी सरकारने उद्योगपतींचे मागील ७ वर्षात ११ लाख कोटी रुपये माफ केल्याचाही आरोप आपने केला.
-
-
मोदी जगासमोर दिल्लीच्या विकासाचं मॉडेल का ठेऊ देत नाही, असा सवालही आपने केला.
-
मोदींना देशाच्या राजधानीचं कौतुक झाल्यास काय अडचण आहे, असाही सवाल आपने पंतप्रधान मोदींना केलाय. (आप ट्विटर व संग्रहित छायाचित्र)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड