-
आज अनेकजण एटीएममध्ये व्यवहार करतात. परंतु जर तुम्हाला एटीएम व्यवहाराचे नियम आणि शुल्क माहित नसेल तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. आरबीआयने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा आणि शुल्क यासाठी नियम केले आहेत. त्यानुसार बँकांनी त्यांचे शुल्क निश्चित केले आहे. ( फोटो साभार : pexels )
-
आरबीआयच्या नव्या नियमांनुसार बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली या सहा मेट्रो शहरांमधील एटीएमचे नियम बदलले आहेत. या शहरात एका महिन्यात किमान तीन एटीएम व्यवहार विनामूल्य करता येईल, तर इतर शहरांमध्ये बँकांना त्यांच्या बचत बँक खातेधारकांना किमान पाच विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी द्यावी लागेल. ( फोटो साभार : pexels )
-
एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि बंगळुरू या 6 मेट्रो शहरांमध्ये तीन मोफत व्यवहार करू शकता. तर इतर ठिकाणी एका महिन्यात 5 मोफत व्यवहार करता येईल. पाच व्यवहारांनंतर इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास २० रुपये शुल्क आणि जीएसटी तसेच एसबीआयच्या एटीएमवर १० रुपये शुक्त आणि जीएसटी आकारला जाणार आहे. ( फोटो साभार : pexels )
-
एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, एचडीएफसी बँकेच्या बचत खातेधारकांना मेट्रो शहरातील एटीएममध्ये तीन निशुल्क व्यवहार आणि इतर शहरांमध्ये पाच विनामूल्य व्यवहार निशुल्क असेल. यापेक्षा जास्त व्यवहार केल्या २१ रुपये अधिक जीएसटी आकारला जाणार आहे. ( फोटो साभार : pixabay )
-
आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून केलेले पहिले पाच व्यवहार विनामूल्य आहेत. त्यानंतर, ग्राहकांना पैसे काढण्यासाठी २१ रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल. ( फोटो साभार : pixabay )
-
तसेच मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या सहा मेट्रो शहरात आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून दर महिन्याला पहिले तीन व्यवहार नि:शुल्क असेल. तर इतर शहरांमध्ये पहिले पाच व्यवहार नि:शुल्क असणार आहे. ( फोटो साभार : pixabay )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”