-
शिवसेनेचे माजी नेते विजय शिवतारे हे अजित पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे.
-
हेच विजय शिवतारे आता अजित पवाराचं कौतुक करु लागल्याचं चित्र दिसत आहे.
-
शिवतारे यांनी नुकताच शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.
-
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवतारेंच्या भूमिकेमध्ये बदल झाल्याचं चित्र दिसत आहे.
-
केवळ अजित पवाराचं कौतुक नाही तर शिवतारे आता शिंदे गटात गेल्यानंतर संजय राऊतांवर टीका करताना दिसत आहेत.
-
शिवतारेंना आमदार होऊ देणार नाही असं अजित पवारांनी जाहीर सभेत सांगण्याइतका नेमका शिवतारे आणि पवारांमध्ये काय वाद झाला होता आणि आता उद्धव ठाकरेंचं नाव घेत शिवतारेंनी काय दावा केलाय हे आपण या गॅलरीमधून पाहणार आहोत.
-
अजित पवारांबद्दल भूमिका बदलतानाच शिवतारेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय.
-
शिवसेना सोडून शिंदे गटात गेल्यानंतर शिवतारेंनी संजय राऊतांवर मात्र कठोर शब्दांमध्ये टीका केलीय.
-
राऊतामुळेच आपला विधानसभेला पराभव झाला आणि शिवसेनेची दूर्दशा झाली, असा आरोप शिवतारेंनी केलाय.
-
काही दिवसांपूर्वीच शिवतारेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली. त्यानंतर त्यांनी, “मी २९ जूनलाच शिंदेंसोबत जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं, माझी काय हकालपट्टी करणार?”, असा प्रश्न विचारला होता.
-
“२९ जूनला पत्रकार परिषद घेऊन पुण्यात माध्यमांसमोर मी माझी भूमिका मांडली होती. त्यात मी स्पष्टपणे म्हटलं होतं की महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही सगळे शिवसेनेतच आहोत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फारकत घ्यावी, सगळं ठीक होईल. शिंदेंचीही भूमिका हीच होती. याच कारणासाठी एकनाथ शिंदेंसोबत गेलो.” असं शिवतारे म्हणाले होते.
-
“संजय राऊतांनीच हे सगळं घडवून आणलंय. संजय राऊतांची निष्ठा शिवसेनेशी किती आहे आणि शरद पवारांशी किती आहे हे महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे,” असं शिवतारे म्हणाले होते. तसेच शिवसेनेच्या परिस्थितीबद्दल बोताना, “अख्ख्या महाराष्ट्राला जे कळतंय, ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना का कळत नाहीये?,” असा टोलाही शिवतारेंनी लागवला होता.
-
“उद्धव ठाकरे म्हणाले की खालच्या पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्या. एवढं मोठं नुकसान पक्षाचं झाल्यानंतरही हे होतंय. हे काय गारूड आहे? भानामती आहे की काय? हिप्नॉटिजम आहे की काय? अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्यांना पडायला लागले आहेत”, असं शिवतारे म्हणाले होते.
-
“वैद्यकीय क्षेत्राकत स्किझोफ्रेनिया (दुभंगलेलं व्यक्तिमत्व) नावाचा एक रोग आहे. बहुतेक हा रोग हुशार माणसांनाच होतो. ही माणसं अतीविचाराच्या गर्तेत जातात आणि त्यातच डुंबतात. वेगवेगळ्या प्रकारचे भास त्यांना होत असतात”, अशा शब्दांत विजय शिवतारेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.
-
संजय राऊत आपले मित्र असेल तरी त्यांच्यामुळेच माझा पराभव झाल्याचा दावाही शिवतारेंनी केला.
-
“गोव्यात ते आदित्य ठाकरेंना घेऊन गेलेले. तिथं पराभव झाला,” असं शिवतारे म्हणालेत.
-
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आमची लढाई यांच्याशी नाही नोटाशी आहे. खरोखरच नोटापेक्षा कमी मतं आम्हाला मिळाली. नामुष्की झाली,” असंही शिवतारे राऊतांनी शिवसेनेची दूर्दशा केल्याच्या आरोपासंदर्भात बोलताना म्हणालेत.
-
संजय राऊतांवर टीका करण्याबरोबरच अजित पवारांच्या कुटुंबावर २०१९ च्या निवडणुकीत केलेल्या वादग्रस्त टीकेवरुनही आता शिवतारेंची भूमिका बदलल्याचं दिसतंय.
-
अजित पवारांवर टीका करणं ही आपली चूक होती असं शिवतारे आता जाहीरपणे सांगत आहेत.
-
“ती माझी चूक होती. एखाद्या राजकीय नेत्याचा मुलगा जेव्हा निवडणुकीला उभा असतो तेव्हा काही मर्यादा पाळायच्या असतात त्या नाही पाळल्या मी”, असं एका ठिकाणी कार्यकर्त्यांसमोर बोलताना शिवतारे यांनी म्हटलंय.
-
उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुनच आपण पवार घराण्यावर पातळी सोडून टीका केल्याचा दावाही शिवतारे यांनी केलाय.
-
शिंदे गटामध्ये सहभागी झाल्यानंतर शिवतारेंनी हा गौप्यस्फोट केला आहे.
-
केवळ उद्धवच नाही तर आदित्य ठाकरेंचाही उल्लेख शिवतारे यांनी केलाय.
-
“शिवतारे पवारांवर बोलण्यासाठी तुमच्याशिवाय दुसरा प्रचारक नाही. म्हणून मावळची जबाबदारी तुमच्याकडे असं आम्हाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सांगितलं आणि जबाबदारी दिली,” असं शिवतारे म्हणालेत.
-
प्रचार केला, खऱ्या गोष्टी काही मांडल्या. जे काही घडलं आहे मी आज जाहीरपणे सांगतो की ती माझी चूक होती, असं पवारांवरील टीकेबद्दल बोलताना शिवतारेंनी म्हटलंय.
-
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
-
या निवडणुकीमध्ये पार्थ पवारांविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणूक लढत होते.
-
या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवतारेंनी पवारांवर पातळी सोडून टीका केली होती.
-
त्यामुळेच पवारांचा आपल्यावर राग असल्याचं शिवतारेंचं म्हणणं आहे.
-
लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होती.
-
त्यामुळे विधानसभेला विजय शिवातारेंचा पराभव करण्याचा चंग अजित पवारांनी बांधला होता.
-
यासंदर्भातील थेट आव्हानच अजित पवारांनी एका सभेमध्ये दिलं होतं.
-
“विजय शिवतारे काय पोपटासारखा मिठू मिठू बोलायला लागलाय. अरे विजय शिवतरे तुझं बोलणं किती?, तुझा आवाका किती?, तू बोलतोयस कुणावर,” असं म्हणत अजित पवारांनी जाहीर सभेत शिवतारेंवर टीका केली होती.
-
“तुला यंदा दाखवतो. यंदा कसा आमदार होतो ते बघतो,” असंही अजित पवार शिवतारेंसंदर्भात बोलताना म्हणाले होते.
-
“अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय मी जर एकदा ठरवलं एखाद्याला आमदार करायचं नाही तर कुणाच्या बापाला ऐकत नाही”, असंही अजित पवार म्हणाले होते.
-
२०१९ साली पार्थ पवारांविरोधात प्रचार करताना केलेल्या या टीकेचा आता पश्चाताप शिवतारेंना होतोय. त्यामुळे त्यांनी आता अजित पवारांचं कौतुक करण्यास सुरुवात केलीय.
-
“हा वाईटपणा का घेतला? काय आमचं घोडं मारलंय पवारांनी? काय अजितदादांनी वाईट केलेलं आहे?” असं आता शिवतारेच आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना म्हणालेत.
-
“माझ्या टीकेनंतर ते (अजित पवार) म्हणाले होते आता हा कसा निवडून येतो तेच बघतो,” असा संदर्भ देत शिवतारेंनी अजित पवारांचं वक्तव्य बरोबरच होतं असं म्हटलंय. “बरोबरच आहे त्यांचं काय चूक आहे त्यात?” असं आज शिवतारेच म्हणताना दिसत आहेत.
-
आता शिवतारेंच्या या भूमिकेवर अजित पवार काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?