-
१८ जुलैला झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आज देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत.
-
भाजपाकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली होती.
-
बहुमताच्या जोरावर द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
-
सध्या रामनाथ कोविंद देशाचे राष्ट्रपती असून त्यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी पूर्ण होणार आहे.
-
राष्ट्रपतीपदाला विषेश महत्व आहे. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरीक असतात.
-
राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीला कोणकोणत्या सुविधा मिळतात, यावर एक नजर टाकूया.
-
२०१७ सालापर्यंत राष्ट्रपतींना दरमहा १.५० लाख पगार दिला जात होता.
-
मात्र, २०१७ मध्ये त्यांच्या पगारात वाढ करण्यात आली असून आता राष्ट्रपतींना महिना पाच लाख रुपये पगार दिला जातो.
-
तसेच राष्ट्रपतींच्या जोडीदाराला (नवरा किंवा बायको) महिना ३० हजार रुपये सचिवीय सहाय्य म्हणून दिले जातात.
-
पगाराव्यतिरिक्त राष्ट्रपतींना इतरही अनेक सुविधा पुरविल्या जातात.
-
नवी दिल्लीतील ‘राष्ट्रपती भवन’ हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.
-
५ एकरमध्ये पसरलेल्या या भवनात ३४० खोल्या आहेत. या भवनात राष्ट्रपतींच्या सेवेसाठी जवळपास २०० कर्मचारी आहेत.
-
राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेसाठी ८६ सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-
राष्ट्रपतींसाठी मर्सिडिज बेंझ ही सुरक्षेने परिपूर्ण अशी गाडी आहे. याशिवाय त्यांच्यासोबत २५ गाड्यांचा ताफा असतो.
-
राष्ट्रपतींच्या देश-विदेशातील प्रवासाचा खर्च केंद्र सरकार उचलते. राष्ट्रपतींसोबतच त्यांच्या जोडीदारालाही रेल्वे तसेच विमानात निशुल्क प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
-
कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही राष्ट्रपतींना अनेक सुविधा देण्यात येतात.
-
त्यांना आयुष्यभर राहण्यासाठी घर आणि वैद्यकीय सुविधा केंद्र सरकारकडून पुरवल्या जातात.
-
घरात काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महिना ६० हजार रुपये एक मोबाईल आणि टेलिफेन कनेक्शनही दिले जाते. तसेच दरमहा १.५ लाख रुपये पेन्शन स्वरुपात दिले जातात. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल