-
ठाणे जिल्ह्यातील महामार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा परिणाम अंतर्गत वाहतूकीवरही होऊ लागला असून या कोंडीमध्ये बस आणि रिक्षा अडकून पडत आहेत.
-
यामुळे थांब्यांवर पुरेशा बसगाड्या आणि रिक्षा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका सकाळी कामावर जाणाऱ्या आणि सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्यांना बसत आहे.
-
या प्रवाशांच्या रिक्षा आणि बस थांब्यांवर लांब रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येते.
-
तसेच आसपासच्या शहरातून ठाणे शहरात दररोज कामासाठी येणाऱ्यांना रिक्षा आणि बसगाड्या उपलब्ध होत नसून त्यांना थांब्यावरील रांगेत ताटकळत उभे रहावे लागते.
-
सॅटीस पूलावरील बसथांब्यावर आणि पुलाखाली रिक्षा थांब्यावर प्रवाशांच्या लांब रांगा लागत आहेत.
-
यामुळे प्रवाशांचे २० ते २५ मिनीटे वाया जात आहेत
-
वाहने वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांना कामावर जाण्यासाठी दररोज उशीर होत आहे.
-
घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या टीएमटीच्या बसगाड्यांच्या थांब्यांवर प्रवाशांच्या रांगामध्ये वाढ होत आहे.
-
खड्ड्यांमुळे वाहने संथगती चालवली जात असल्याने कल्याण-शिळफाटा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते.
-
वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याने . या भागातील शाळकरी विद्यार्थ्यांना आता कोंडीचा फटका बसू लागल्याने पालक, शिक्षक हैराण आहेत.
-
काटई नाका ते शिळफाटा चौक, काटई-बदलापूर काटई नाका, मानपाडापर्यंत वाहनांच्या रांगा दिसतात.
-
सकाळच्या वेळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत शाळा गाठावी लागते.
-
यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकवर्गाला देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
-
कल्याण अहमदनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.
-
कल्याणहून अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हारळ गावापासून थेट कांबा गावापर्यंत वाहतूक कोंडी दिसून येते.
-
असंख्य वाहने तासनतास रस्त्यावर खोळंबलेली दिसतात.
-
गेल्या काही दिवसात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे खड्डे मोठे झाले असून येथून वाहनांना प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे