-
आपल्या देशात असंघटित कामगारांची संख्या लक्षणीय आहे. असंघटित क्षेतात काम करत असल्यामुळे या कामगार वर्गाला आरोग्य विषयक समस्या तसेच आर्थिक चणचण यांना सामोरे जावे लागते.
-
या कामगारवर्गाच्या उन्नतीसाठी भारत सरकारकडून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम केले जाते. पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनीदेखील यापैकीच एक आहे. या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक मदत व्हावी यासाठी प्रयत्न केला जातो.
-
ज्यांचे EPFO किंवा ESIC खाते आहे, अशा कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
-
या योजनेसाठी वय वर्षे १७ ते ४० वयोगटातील कामगार अर्ज करु शकतात. अर्ज केल्यानंतर या योजनेमध्ये अल्प गुंतवणूक करावी लागणार आहे. १८ वर्षे असलेल्या कामगाराला ५५ रुपये प्रतिमाह प्रमाणे गुंतवणूक करावी लागेल.
-
तसेच २९ वर्षे वय असलेल्या कामगाराला १०० रुपये प्रतिमाह तर ४० वर्षे असलेल्या कामगाराला प्रतिमाह २०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. वयानुसार या गुंतवणुकीत बदल होईल.
-
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर ६० वर्षानंतर कामगाराला प्रतिमाह ३ हजार रुपये पेंशनच्या स्वरुपात मिळतील. तसेच गुंतवणुकीनुसार या लाभाचे प्रमाणही बदलत राहील.
-
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी https://maandhan.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर सर्व माहिती योग्य पद्धतीने भरल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येईल.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”