-
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागात आज(शनिवार)सकाळी पाण्याची टाकी फुटली.
-
त्यामुळे परिसरातील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे.
-
इंदिरानगर ही वस्ती डोंगर उतारावर आहे. येथील रहिवाशांना पाण्याची सुविधा मिळावी म्हणून येथे पाण्याचा साठा करण्यासाठी मोठ्या टाक्या बसविल्या आहेत.
-
आज सकाळी येथील एक टाकी फुटली. त्यामुळे टाकीजवळ आणि डोंगर उतारावर राहणाऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरले.
-
यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभाग दाखल झाले.
-
पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की, यात सहा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घरांचे छप्पर, भिंती तुटून पडल्या.
-
तर या दुर्घटनेत १५ घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
-
याशिवाय, तानुबाई मुठे (७६) ही महिलाही देखील जखमी झाली असून तिला उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
२००९ मध्ये ठाणे महापालिकेने बांधलेल्या या पाण्याच्या टाकीची साठवण क्षमता ७५००० लिटर आहे.
-
टाकी कशामुळे फुटली? या दुर्घटनेत किती जणांचे नुकसान झाले? याबाबत प्रशासन आता माहिती घेत आहे.

१०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला ६ दुर्मिळ राजयोग! ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल चिक्कार पैसा? लक्ष्मीच्या कृपेने सुख-समृद्धीत होणार वाढ!