-
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर विदर्भात पून्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
-
प्रामुख्याने वर्धा जिल्ह्यातील काही तालुके पूराच्या तडाख्यात सापडले असून अनेक मार्ग बंद झाले आहेत.
-
नागपूरसह विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे.
-
मागील संपूर्ण आठवडा तसेच या आठवड्यात देखील मंगळवारपर्यंत विदर्भ पूरमय झाला होता.
-
गेले दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने हळूहळू पाणी ओसरण्यास सुरुवात झाली होती. मात्र, पाऊस पुन्हा परतल्याने नदीपरिसरातील नागरिकांना धडकी भरली आहे.
-
वर्धा जिल्हा मुसळधार पावसामुळे दुसऱ्यांदा प्रभावित झाला आहे.
-
शाळा पूर्ण पणे पाण्याने वेढल्या गेली आहे.
-
समुद्रपूर वाशी मार्ग बंद पडला आहे.
-
प्रशासन व स्थानिक नागरिक मदत व बचावकार्य करत आहे.
-
वाघाडी मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
-
चंद्रपूर जिल्ह्यातही इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
-
परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा