-
१. माझी मानेखालील सर्व हालचाल बंद झाली होती, श्वास घेता येत नव्हता आणि पोटही हलत नव्हतं. त्यावेळी काही लोक मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते.
उद्धव ठाकरे -
२. मी रुग्णालयात पूर्णपणे निश्चल झालो होतो. तेव्हा हा आता उभा राहणार नाही, असं पसरवलं जात होतं. तसेच तुझं काय होणार असं विचारलं जात होतं.
उद्धव ठाकरे -
३. पक्षप्रमुखाची शस्त्रक्रिया झाल्यावर यांनी पक्षाला सावरण्याची वेळ होती. मात्र, जेव्हा माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत असेन.
उद्धव ठाकरे -
४. मी ज्यांना दोन क्रमांकाचं पद देऊन पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, त्यांनी मी रुग्णालयात असताना विश्वासघात केला.
उद्धव ठाकरे -
५. आम्ही हिंदुत्व सोडलं अशी बोंब जे मारत आहेत त्यांना मला प्रश्न विचारायचं आहे की २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा आपण काय सोडलं होतं?
उद्धव ठाकरे -
६. त्यांना ताकद दिली ही माझी चूक आहे. राजकारणात जन्म दिलेल्या आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे
उद्धव ठाकरे -
७. विश्वासघातक्यांना माझ्याबद्दल काय वाटतं याबद्दल मला चिंता नाही. महाराष्ट्राच्या जनतेला मी त्यांच्या कुटुंबातला वाटतो. हे असं भाग्य फार कमी लोकांच्या नशिबी येतं आणि ते यांच्या नशिबी आलं असेल असं वाटत नाही.
उद्धव ठाकरे -
८. सामान्यांना बाळासाहेबांनी असामान्यत्व दिलं हीच शिवसेनेची ताकद आहे. पुन्हा एकदा सामान्यांमधून असामान्य घडवण्याची वेळ आली आहे.
उद्धव ठाकरे -
९. महाराष्ट्र फार सुंदर आहे. ग्रामीण भागातील आमदारांना या निसर्गाची भुरळ पडत नाही, पण गुवाहाटीमधील निसर्गाची भुरळ पडते. महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्याची तुम्हाला ओढ, प्रेम नाही. त्याचं वैभव कधी दिसलं नाही.
उद्धव ठाकरे -
१०. जोपर्यंत हे दिल्लीत गेले नव्हते, तोपर्यंत बाळासाहेब ठाकरेच यांना जपत आणि वाचवत आले होते. एका हिंदुत्वाच्या ध्यासापायी, वेडापायी बाळासाहेबांनी त्यांना वाचवलं होतं. मग दिल्लीत खुर्चीला असा काय स्प्रे मारला आहे की, ज्यांनी जपलं त्यांनाच संपवायला निघाला आहात.
उद्धव ठाकरे -
११. सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब हे स्वत:चे म्हणून लोकांसमोर आणायचे. आपल्याकडून काही आदर्श निर्माण नाही झाला तर पक्ष फोडतात त्याप्रमाणे ते आता आदर्शही पळवू लागलेत.
उद्धव ठाकरे -
१२. त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत.
उद्धव ठाकरे -
१३. बाळासाहेबांनंतर मी शिवसेना उभी केली हेच त्यांच्या पोटात दुखतंय.
उद्धव ठाकरे -
१४. शिवसैनिकांमध्येच लढाई लावून शिवसेना संपवायचा भाजपाचा डाव आहे.
उद्धव ठाकरे -
१५. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्व मजबूत करण्यासाठी राजकारण केलं. भाजपा राजकारणासाठी हिंदुत्व वापरत आहे. हा त्यांच्या आणि आमच्यातला फरक आहे.
उद्धव ठाकरे -
१६. एक प्रसंग, गोष्ट किंवा मी मुख्यमंत्रीपदावर असताना घेतलेला निर्णय दाखवा की ज्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं.
उद्धव ठाकरे -
१७. अयोध्येतील महाराष्ट्र भवन, तिरुपती मंदिरासाठी नवी मुंबईत दिलेली जागा, प्राचीन मंदिरांचं संवर्धन, गडकिल्ल्यांचं संवर्धन या साऱ्या निर्णयांमधून आपण हिंदुत्वापासून कसे दूर गेलो हे सांगावं.
उद्धव ठाकरे -
१८. शिवसेना आणि संघर्ष हे एकमेकांच्या पाचवीला पुजलेले आहेत.
उद्धव ठाकरे -
१९. जिथे अन्याय तिथे वार हे शिवसेनेचं ब्रिद वाक्य आहे.
उद्धव ठाकरे -
२०. राजकीय पक्षांनी युती करतानाचा करार हा लोकांसमोर आणण्याचा कायदा केला पाहिजे.
उद्धव ठाकरे -
२१. माझ्यासोबत जे ठरवलं होतं ते भाजपाने नाकारल्याने महाविकास आघाडीचा जन्म झालं. नाहीतर महाविकास आघाडी झाली नसती.
उद्धव ठाकरे -
२२. मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा शिवतिर्थ पूर्ण फुलून गेलं होतं. लोक माझ्या निर्णयावर नाराज असती तर तिकडे कोणी आलं नसतं.
उद्धव ठाकरे -
२३. आता निवडणुका घ्या. जर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करुन चूक केली असेल तर लोक आम्हाला घरी बसवतील. होऊ द्या जनतेच्या न्यायालयामध्ये फैसला. माझी तयारी आहे.
उद्धव ठाकरे -
२४. आम्हाला शिवसेनेवरील दाव्यासाठी पुरावा द्यायची गरज नाही. निवडणुका येऊ दे आम्ही यांनाच (बंडखोरांना) पुरुन टाकतो असं लोक म्हणतायत.
उद्धव ठाकरे -
२५. ठाणेकर सुज्ञ आहेत. हा जो पालापाचोळा आहे ते म्हणजे ठाणेकर नाहीत. ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे नातं पालापाचोळ्याला तोडता येणार नाही.
उद्धव ठाकरे
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”