-
शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त आज(मंगळवार) पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शिवसेनेच्या नेत्या, उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते ६२ किलो वजनाचा केसरी मोदक अर्पण करण्यात आला.
-
तसेच यावेळी नीलम गोऱ्हे यांनी महाआरती देखील केली.
-
याप्रसंगी शहरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
-
यावेळी नीलम गोऱ्हे यांनी श्रींच्या पादुकांची पुजा देखील केली.
-
याप्रसंगी नीलम गोऱ्हे यांनी गणरायाची पूजा करत आशीर्वाद घेतले.
-
उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी ६२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हा ६२ किलो वजनाचा केसरी मोदक तयार करण्यात आला होता.
-
रक्तदान शिबीर आणि अन्य उपक्रमामधून वाढदिवस दरवर्षी साजरा केला जातो. त्यानुसार सर्वांनी वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन देखील नीलम गोऱ्हे यांनी या अगोदर केलेले आहे.
-
या ६२ किलो वजनाच्या कोसरी मोदकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
-
या मोदकावर ड्रायफ्रुट्स आणि चांदीचा मुलामा लावला होता. त्यामळे तो अधिकच आकर्षक दिसत होता.
-
आरतीनंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य मी स्वत: ऐकलेलं आहे. देवाच्या देवळात येत असताना, राजकारणाचे जोडे बाहेर ठेऊन यायचे असतात.”
-
“त्यामुळे आम्ही कधीही कोणाचाही विरोधासाठी आरती केलेली नाही.”
-
“राजकारणात आमचे जरी कुणाशी मतभेद असतील, आम्ही कधीही देवाच्या दारात आल्यावर ते बाजूला ठेवतो.”
-
“पुण्याची परंपरा आहे, अगदी कसबा गणपतीची पालखी असेल किंवा विसर्जन मिरवणूक असेल सर्वजण एकत्र येतो आणि हीच परंपरा पाळली जावी अशी आमची अपेक्षा आहे.”
-
“आमच्या मनात दुसरा कोणताही किंतू, परंतु किंवा राजकीय डावपेच नाही.”
-
“शिवसेना कुठेही असो, सत्तेत किंवा विरोधात परंतु मदतीचं काम सदैव सुरू ठेवा, असंच आम्ही कार्यकर्त्यांना सांगत असतो.”
-
“आम्हा शिवसैनिकांच्या मनातील ओळखून उद्धव ठाकरे बोलत असतात.”
-
“जे मनात आहे तेच व्यक्त करायचे ही बाळासाहेब ठाकरेंची परंपरा आजही उद्धव ठाकरे हे चालवत आहेत.”
-
तसेच, “सध्याचा राजकारणाचा प्रांत मोठा झाला आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने वाद केले जात असतात. मी एक भगवद्गगीतेवर विश्वास ठेवणारी अस्तिक आहे, त्यामुळे जे गेलेले आहेत, त्यांचा शोक करायचा नाही.”
-
“आपल्यातून जे दुसरीकडे गैरसमजातून गेले असतील, त्यांचे गैरसमज दूर होतील आणि पुन्हा एकदा नदीचा प्रवाह सुरू होईल.”, असा मला विश्वास आहे. असं या अगोदर नीलम गोऱ्हे यांनी बोलून दाखवलेलं आहे.
-
६२ किलो वजनाचा हा मोदक गणरायाच्या चरणी ठेवण्यासाठी तो चार पुजाऱ्यांना उचलावा लागला.
-
गणरायाच्या गाभाऱ्यात हा भव्य असा केसरी मोदक अधिकच शोभून दिसत होता.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”