-
१. नितीन गडकरी म्हणाले होते की, ‘आमच्याकडे वॉशिंग मशिन आहे. लोकांना आमच्या पक्षात घेऊन आम्ही पुण्यवान करतो.’ आरोप असणारे त्यांच्या पक्षात गेल्यावर त्यांचं पुढे काय होणार आहे? शिवसेनेच्या ज्या नेत्यांना २४ तासात तुरुंगात जातील असे आरोप होत होते ते भाजपात गेल्यावर स्वच्छ झाले – उद्धव ठाकरे
-
२. संजय राऊतांवरही आरोप होत आहेत. त्यांनाही अटक केलं जाईल असं वातावरण निर्माण केलं जातंय. याला काय म्हणायचं? असं होऊनही ते हटत नाही – उद्धव ठाकरे
-
३. बाळासाहेब ठाकरे सांगायचे तो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका. शेवटी प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो – उद्धव ठाकरे
-
४. विरोधकांना दडपशाहीविरोधात लढण्यासाठी इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे. एकत्र यायचं झालं तर कुणीही पदांवरून भांडणार नाही असं ठरवलं पाहिजे – उद्धव ठाकरे
-
५. माझ्याकडे दडपशाहीविरोधात लढण्याची इच्छाशक्ती आहेच. मात्र, प्रश्न माझ्या एकट्याचा नाही. देशातील सर्व राज्यांनी एकत्र व्हायला हवं – उद्धव ठाकरे
-
६. भाजपा व आम्ही २५-३० वर्षे मित्रच होतो, तरी २०१४ मध्ये त्यांनी युती तोडली होती. कारणं काहीच नव्हती. तेव्हाही आपण हिंदुत्व सोडलेलं नव्हतं आणि आजही सोडलेलं नाही – उद्धव ठाकरे
-
७. मी सरत्या काळात शिवसेना प्रमुखांना वचन दिलं होतं की, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. माझं ते वचन आजही अर्धवट आहे. कारण तेव्हा मी मुख्यमंत्री होईन असं बोललो नव्हतो – उद्धव ठाकरे
-
८. ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता त्यांच्याच पुत्राला गादीवरून खाली उतरवलं – उद्धव ठाकरे
-
९. त्यांनी (एकनाथ शिंदेंनी) एका भरसभेत राजीनामा दिल्याची व्हिडीओ आहे. त्यात ते भाजपाने शिवसैनिकांवर कसा अत्याचार केला हे सांगत आहेत. माझ्याच समोर त्यांनी राजीनामा दिला होता – उद्धव ठाकरे
-
१०. हल्ली लोकशाहीमध्ये डोकं वापरण्यापेक्षा ते मोजण्यासाठीच जास्त उपयोग होत आहे – उद्धव ठाकरे
-
११. सत्तापिपासूपणा एकदा का रक्तात भिनला की तुम्ही कोणाचे नसता आणि कोणी तुमचं नसतं. तेच त्यांचं (शिंदेंचं) झालेलं आहे – उद्धव ठाकरे
-
१२. मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचीही माझी तयारी नव्हती. मी इच्छेने नाही तर जिद्दीने मुख्यमंत्री झालो – उद्धव ठाकरे
-
१३. केवळ तुमच्या हट्टापायी मुंबईचा घात करु नका. अन्यथा मुंबईच्या बाहेरचे असल्याने यांना मुंबईबद्दल प्रेम नाही असं म्हणावं लागेल. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो, तो केवळ मुंबई, ठाणे किंवा नागपूरचा नसतो – उद्धव ठाकरे
-
१४. मुंबईचा घात होऊ शकतो आणि हे त्यांचं जुनं स्वप्न आहे. जसा रावणाचा जीव बेंबीत, तसा या राज्यकर्त्यांचा जीव मुंबईत आहे. दिल्ली मिळाली तरी मुंबई पाहिजे असा विचित्र प्रकार आहे – उद्धव ठाकरे
-
१५. मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच. फक्त पालिकाच नाही तर विधानसभेच्या निवडणुकाही लवकरात लवकर घ्याव्यात – उद्धव ठाकरे
-
१६. मी महाराष्ट्राच्या जनतेचा ऋणी आहे. मी वर्षा सोडून निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होतं. त्या अश्रूंचं मोल मला आहे. त्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लागल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही – उद्धव ठाकरे
-
१७. त्यांना सत्तेची लालसा आहे. त्यांना स्वत:ला मुख्यमंत्रीपद हवं होतं. त्यांनी मुख्यमंत्रीपद अत्यंत वाईट पद्धतीने मिळवलं – उद्धव ठाकरे
-
१८. ही आमची शिवसेना म्हणत ते स्वत:ची शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागलेत – उद्धव ठाकरे
-
१९. मला नाही वाटतं हे पाहिल्यानंतर भाजपा कधी पुढे त्यांना (एकनाथ शिंदेंना) स्वत:च्या पक्षात घेईल. नाहीतर ते पुढे कधीतरी नरेंद्र मोदींबरोबर तुलना करायला लागतील स्वत:ची आणि पंतप्रधान पद मागतील – उद्धव ठाकरे
-
२०. इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार सोडून जात असताना माझ्या मनात हेच आलं की यातले अनेकजण हे आमच्या कुटुंबासारखेच होते – उद्धव ठाकरे
-
२१. बंडखोर आमदार सूरतला का गेले? कर्नाटकात का नाही गेले? मध्य प्रदेशात का नाही गेले? पहिले गोव्या का नाही गेले? राजस्थानला का नाही गेले. पहिले गुजरातलाच का गेले? – उद्धव ठाकरे
-
२२. बाळासाहेबांच्या कुटुंबियाबद्दल, मातोश्रीबद्दल अश्राघ्य भाषेत जे बोललं गेलं आहे. त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? मातोश्रीबद्दल बोलून सुद्धा तुम्ही शेपट्या घालून जाणार? – उद्धव ठाकरे
-
२३. जर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही पहिली अडीच वर्ष दिली तर ज्या तारखेला राजीनामा द्यायचाय ती तारीख, वार टाकून त्या खाली मुख्यमंत्र्यांची सही आणि खाली पक्षप्रमुख म्हणून माझी सहीचे राजानामा पत्र तुम्हाला देतो. या पत्राचं होर्डिंग करुन मंत्रालयाच्या दारात लावा, असं मी भाजपा सांगितलं होतं – उद्धव ठाकरे
-
२४. एखादा मुख्यमंत्री पायउतार होतो आणि लोक गलबलतात मला वाटतं ही माझ्या आयुष्याची कमाई आहे – उद्धव ठाकरे
-
२५. जी माणसं आपली नव्हती ती आपल्याला सोडून गेली त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही. आपण त्यांना आपलं मानत होतो – उद्धव ठाकरे
![IND vs ENG Shubman Gill touched his head after Adil Rashid clean bowled Axar Patel video viral](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-75.jpg?w=300&h=200&crop=1)
IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल