-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डहाके यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री झाल्याबद्दल मनोहर जोशी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
-
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली.
-
शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सदा सरवणकर, शिवसेना सचिव किरण पावसकर, मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी तसेच त्यांचे नातूही उपस्थित होते.
-
मनोहर जोशी यांच्या सोबतच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डहाके यांचीही आज त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
-
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे आशीर्वाद घेतले.
-
मुख्यमंत्र्यांनी डाके यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळावे, अशी मनोकामना व्यक्त केली.
-
यावेळी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर, आमदार संजय शिरसाट आणि माजी आमदार अशोक पाटील हेदेखील सोबत उपस्थित होते.
-
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
-
-
शिवसेनेतील दुफळी आता स्थानिक पातळीवरदेखील पोहोचली असून सगळीकडे दोन गट निर्माण झाले आहेत.
-
शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे.
-
हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला असून शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल