-
१७ बँकांच्या समुहाची ३४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईसह अन्य शहरांत नुकतेच छापे टाकून साडेबारा कोटी रुपये किमतीच्या वस्तू जप्त केल्या.
-
यामध्ये महागडी घड्याळे, चित्रे, सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
-
सीबीआयने या ३४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी आतापर्यंत १० पेक्षा अधिक व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.
-
सीबीआयने जप्त केलेल्या महागड्या वस्तूंमध्ये एफ. एन. रझा आणि एफ. एन. सौझा यांनी रेखाटलेल्या दुर्मीळ चित्रांचा समावेश आहे.
-
छापेमारी करुन सीबीआयने स्वत:च्या ताब्यात घेतलेल्या या चित्रांची किंमत साडेपाच कोटी रुपये आहे.
-
तसेच या छापेमारीमध्ये प्रसिद्ध कंपन्यांची पाच कोटी रुपये किमतीची दोन घड्याळेही सीबीआयने जप्त केली आहेत. यातील काही वस्तू मुंबईतून जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
-
दोन कोटी रुपये किमतीच्या बांगड्या आणि सोने, हिऱ्याच्या दागिन्यांचाही समावेश सीबीआयने जप्त केलेल्या गोष्टींमध्ये आहे. गैरव्यवहारातील रकमेचा वापर करून आरोपींनी महागड्या वस्तूंची खरेदी केल्याचा सीबीआयला संशय आहे.
-
युनियन बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक विपिन कुमार शुक्ला यांच्या तक्रारीनुसार युनियन बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षतेखालील १७ बँक समूहाची आर्थिक फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
-
आरोपींनी संगनमत करून १७ बँक समूहांकडून ४२ हजार ८७१ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाची काही रक्कम इतरत्र वळवण्यात आली.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख