-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (३० जुलै) तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असताना राज्यातील विविध राजकीय विषयांवर जाहीर भाष्य केलं.
-
यात त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबई-महाराष्ट्र वक्तव्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सामनातील मुलाखतीपर्यंत मोठी विधानं केली. त्यातील १० वक्तव्यांचा आढावा.
-
१. राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही – एकनाथ शिंदे
-
२. राज्यपाल हे एक मोठं पद आहे. राज्यपाल हे संवैधानिक पद असून ते राज्याचे एक प्रमुख व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांनी कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे – एकनाथ शिंदे
-
३. मुंबईतील मराठी माणसाच्या योगदानाची कुणालाही अवहेलना किंवा अवमान करता येणार नाही – एकनाथ शिंदे
-
४. मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. या मुंबईत इतर राज्यातील लोकही रोजगार करतात. मुंबईत मराठी माणसाच्या अस्मितेचा कुणालाही अवमान करता येणार नाही – एकनाथ शिंदे
-
५. आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना मोठी केली आहे. शिवसेना अशीच मोठी झालेली नाही. वयाच्या १६ व्या वर्षापासून आम्ही शिवसेना वाढीसाठी मेहनत करतो आहे – एकनाथ शिंदे
-
६. तुम्ही आमचे आईबाप काढता. आम्ही कधी आमच्या आई-बापांना भेटलो, कधी आमच्या मुलाबाळांना भेटलो ते सांगा. आम्ही वर्षातून दोन दोन, तीन तीन वेळा परदेशात गेलो नाही. फक्त शिवसेना एके शिवसेना करत राहिलो – एकनाथ शिंदे
-
७. भाजपा-शिवसेना युती म्हणून निवडणूक लढलो. मात्र, लोकांनी कौल दिल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं – एकनाथ शिंदे
-
८. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला थारा दिला नाही, त्यांना तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी जवळ केलं. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केलं, मग गद्दारी-विश्वासघात कुणी केला? – एकनाथ शिंदे
-
९. सावरकरांविषयी अपमानजनक शब्द काढणाऱ्या काँग्रेसच्या लोकांविरुद्ध आम्हाला बोलता येत नव्हतं. तोंडाला पट्टी लावून बसावं लागत होतं. मग विश्वासघात आम्ही केला की आणखी कुणी केला – एकनाथ शिंदे
-
१०. सध्या मुलाखतींचा सपाटा सुरू आहे. मी आज जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही. परंतु, जेव्हा माझी मुलाखत होईन आणि योग्य वेळी बोलेन, त्या दिवशी या राज्यात नाही, तर देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही – एकनाथ शिंदे

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”