-
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक आज (रविवारी) सकाळी ७ वाजता त्यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं आहे.
-
आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होणार आहे. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील.
-
याशिवाय संजय राऊत यांच्या घराची झडतीही घेतली जात आहे.
-
संजय राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे.
-
“ही खोटी कारवाई आहे. या प्रकरणातील पुरावे देखील खोटे आहेत. मी शिवसेना सोडणार नाही आणि मरेन पण शरण जाणार नाही.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
-
संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक पोहचल्याची माहिती मिळताच त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झाले आहेत.
-
राऊतांवर राजकीय सुडापोटी कारवाई होत आहे, असा आरोप शिवसैनिक करत आहेत.
-
संजय राऊत यांच्या ईडी कार्यालयावर झालेल्या या कारवाईविरोधात आता शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.
-
तर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राऊतांच्या घराबाहेर मोठा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
-
ईडीची अधिकारी सकाळापासून संजय राऊतांच्या घरात दाखल झाले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
-
ईडीच्या एकूण तीन पथकांकडून कारवाई होत आहे.
-
राऊतांच्या घराबाहेर माध्यम प्रतिनिधींची देखील गर्दी दिसून येत आहे.
-
या प्रकरणी ईडीने आधीही संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली होती.
-
मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती.
-
त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.
-
ईडीचे अधिकारी संजय राऊतांना पुढील चौकशीसाठी ईडी कार्यालयात घेऊन जाणार असल्याची शक्यता आहे.
-
तर ही कारवाई रोखण्यासाठी शिवसैनिकांनी राऊतांच्या घराबाहेर ठिय्या दिल्याचे दिसत आहे.
-
संजय राऊतांच्या निवासस्थाच्या खाली पोलीसांचा कडक बंदोबस्त असून, महिला पोलीसही दाखल आहेत.
-
ईडीचे अधिकारी सकाळीच संजय राऊतांच्या घरी पोहचल्याने खळबळ माजली आहे
-
राऊतांवरील कारवाईमुळे शिवसैनिक आक्रमक होताना दिसत आहेत.

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई