-
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोमवारी (१ ऑगस्ट) त्यांची ही यात्रा कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहचली.
-
यावेळी झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांची अटक, शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या विविध विषयावर भाष्य केलं.
-
त्यांच्या याच भाषणातील १५ महत्त्वाच्या वक्तव्यांचा हा खास आढावा…
-
१. संजय राऊतांना अटक हे महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचं कटकारस्थान आहे आणि हे सर्व जगजाहीर आहे – आदित्य ठाकरे
-
२. हे सर्व एक दीड महिन्याचं आहे, तुम्ही लिहून घ्या हे सरकार कोसळणार आहे. महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही – आदित्य ठाकरे
-
३. सध्या दोन लोकांचं जंबो मंत्रीमंडळ आहे. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री हेच कळत नाही. कुणी कुणाला बोलू देत नाही. सध्या त्यांचं लक्ष घाणेरड्या राजकारणावर आहे- आदित्य ठाकरे
-
४. मी आजोबा आणि वडिलांसोबत लहानपणापासून फिरलो, पण इतकं घाणेरडं राजकारण पाहिलं नाही – आदित्य ठाकरे
-
५. पक्ष फोडो, गद्दारी करा, ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, तुम्हाला राजकीय ओळख दिली, सगळं काही दिलं त्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणं ही कधीही महाराष्ट्राची ओळख नव्हती – आदित्य ठाकरे
-
६. हे सरकार फक्त बेकायदेशीरच नाही, तर गद्दार आणि बेईमानांचंही सरकार आहे – आदित्य ठाकरे
-
७. इथून २० आमदार फोडा, तिथून ३० आमदार फोडा, तिथून पाचचा गट घ्या अशी सरकारं बनायला लागली तर देशात किती अस्थिरता निर्माण होईल – आदित्य ठाकरे
-
८. देशात बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे – आदित्य ठाकरे
-
९. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले आहेत हे ओळखा. त्यांनी मुंबई व ठाण्याची मुद्दाम नावं घेतली. कारण निवडणूक येत आहे आणि अशात या ठिकाणी हिंदूंची, तेथील नागरिकांची एकजुट झाली आहे – आदित्य ठाकरे
-
१०. मागील अडीच वर्षात भाषा, प्रांत किंवा धर्मावरून भांडण लागलं नाही, कोणताही वाद, दंगल झाली नाही. पण आता त्याच आपल्या महाराष्ट्राला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व त्यांच्यासारखी माणसं फोडू पाहत आहेत – आदित्य ठाकरे
-
११. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व त्यांच्यासारख्यांना महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत. म्हणून ही मंडळी आपल्यात वाद निर्माण करत आहे – आदित्य ठाकरे
-
१२. मराठी माणसाला वेगळं करायचे, शिवसेनेला फोडायचं, संपवून टाकायचं, ठाकरे कुटुंबाचं महत्त्व कमी करायचं, असा प्रयत्न सुरू आहे. मात्र, ठाकरे कुटुंब संपणार नाही, कारण ते माझ्यासमोर इथं सभेत उभं आहे – आदित्य ठाकरे
-
१३. जे प्रश्न विचारतील, ज्यांचा आवाज बुलंद आहे त्यांच्यावर दडपशाही करायची, महाराष्ट्राला संपवून टाकण्याचा प्रकार सुरू आहे – आदित्य ठाकरे
-
१४. एकदा महाराष्ट्र संपला की त्यांचे सर्व धंदे सुरू होतील, असं त्यांचं राजकारण आहे. याच राजकारणात आपले ४० निर्लज्ज गद्दार फसले आहेत – आदित्य ठाकरे
-
१५. हे गद्दार आधी सांगायचे की आमच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी, आदित्य ठाकरेंविषयी प्रेम आहे, आदर आहे. तुमच्याविषयी मनात उच्चस्थान आहे. मात्र, त्यांच्या दोन आठवड्यातील पत्रकार परिषदा आणि वक्तव्ये काढा. त्यांच्या मनात आणि डोळ्यात शिवसेनेबद्दल, शिवसैनिकांविषयी, पक्षप्रमुख व माझ्याविषयी राग व द्वेष दिसत आहे – आदित्य ठाकरे (सर्व छायाचित्र सौजन्य – आदित्य ठाकरे ट्विटर व लोकसत्ता प्रतिनिधी)

DC vs MI: रोहित शर्माचा एक निर्णय अन् नवा चेंडू ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, डगआऊटमधून हिटमॅन कसा ठरला गेमचेंजर?