-
सावंतवाडीमध्ये येऊन माझ्या विरोधात यापूर्वी ज्यांनी ज्यांनी भाषणे केली ते पराभूत झाले, ही वस्तुस्थिती आहे, असं शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलंय.
-
याच कारणामुळे माझ्या विरोधात सभेत बोलणाऱ्या विरोधात मी सावंतवाडीत येऊन उत्तर देणार आहे, असंही केसरकर यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंच्या सावंतवाडीमधील सभेनंतर केसरकरांनी हे विधान केलं आहे.
-
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी निष्ठा दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले.
-
आदित्य यांनी सावंतवाडी मतदारसंघाचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात शिवसेना समर्थकांसोबत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
-
यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
यावेळी चिटणीस नाका ते गांधीचौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
-
आदित्य ठाकरेंनी सावंतवाडीतील सभेचे काही फोटो आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअऱ केले आहेत.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य यांच्या या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय.
-
एकनाथ शिंदे यांना पक्षातील ४० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे शिंदे गटाची बाजू भक्कम आहे.
-
दुसरीकडे मुख्य शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेत झालेली ही मोठी फूट भरून काढण्यासाठी शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे चांगलेच कामाला लागले आहेत.
-
शिवसेना पक्षाची हानी करणारे एक राऊत जेलमध्ये गेले, आता दुसरे राऊत मैदानात उतरले आहेत, ते आहे ती शिवसेना संपविणार आहेत. त्यांना योग्य उत्तर दिले जाईल असे आमदार केसरकर म्हणाले.
-
तसेच आदित्य यांच्या सभेसंदर्भात बोलताना सावंतवाडीमध्ये येऊन सभेला उत्तर दिले जाईल असेही केसरकर यांनी सांगितले.
-
जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे आजच्या सभेत ५००-१००० लोक उपस्थित होते, असं केसरकर म्हणाले.
-
मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा २५ हजार लोक होते असा टोला केसरकर यांनी हाणला.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यासाठी मुंबईमध्ये राहात आहे, असंही केसरकर म्हणाले.
-
केंद्र व राज्य स्तरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची भूमिका मांडली जात आहे असे केसरकर यांनी सांगितले.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती