-
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केलेल्या आरोपांचीही चर्चा सुरू झाली आहे.
-
कुख्यात युसूफ लकडावाला याचे राणा दाम्पत्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी तीन महिन्यांपूर्वी केला होता.
-
आता, राज्यात झालेल्या सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
-
युसूफ लकडावालाकडून नवनीत राणांनी ८० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.
-
दुसरीकडे, हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक अफरातफरीशी निगडित असल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी करणार का, असा सवाल राऊत यांनी केला होता.
-
राऊत यांनी नवनीत राणा यांच्या निवडणूक शपथपत्रातील कागदपत्रांच्या आधारे हे आरोप केले.
-
लकडावाला याचे कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंध होते.
-
अनेक गुन्हेगारी व दहशतवादी कारवायांशी त्याचा संबंध होता. तुरुंगात असतानाच तो मरण पावला.
-
राणा यांनी लकडावालाकडून ही रक्कम कर्जरूपाने का व कशासाठी घेतली, त्याच्याशी काय संबंध होते, असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले होते.
-
नवनीत राणा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या शपथपत्रातील जंगम मालमत्तांच्या तपशीलात गुंतवणुकीविषयीच्या रकान्यात क्रमांक ३ वर युसूफ लकडावाला – ८० लाख रुपये असा उल्लेख आहे.
-
याआधारे संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर आरोप केले.
-
आरोप खोटे आहेत. आम्ही युसूफ लकडावाला याला ओळखतही नव्हतो. तो एक बांधकाम व्यावसायिक होता, असं बडनेराचे आमदार रवी राणा यांनी या आरोपांबद्दल म्हटलं आहे.
-
त्याच्या गृह प्रकल्पातील एक सदनिका आम्ही विकत घेतली, असंही रवी राणा यांनी सांगितलं.
-
पोलिसांनी ‘एसआयटी’मार्फत चौकशी केली आणि ही ‘फाईल’ बंद झाली आहे, असंही राणांनी स्पष्ट केलं आहे.
-
संजय राऊतांना पुरावे सादर करता आले नाही, आरोप केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तेही काही बोलू शकले नाहीत.
