-
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणजेच ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे.
-
या निमित्ताने न्यायमूर्ती लळीत यांचा सिंधुदुर्ग ते देशाचे सरन्यायाधीश हा प्रवास कसा झाला याचा हा खास आढावा…
-
न्यायमूर्ती उदय लळीत हे मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहेत.
-
देवगड तालुक्यातील कोठारवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे.
-
लळीत यांचे पूर्वज अनेक वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील आपटे गावात स्थलांतरीत झाल्याचं सांगितलं जातं.
-
त्यानंतर लळीत कुटुंब कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले.
-
विशेष म्हणजे लळीत कुटुंबात पिढ्यान पिठ्या वकिलीचा व्यवसाय केला जातो.
-
आगामी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या कुटुंबात वडिलांपासून अगदी आजोबांपर्यंत अनेकांनी वकिली केली आहे.
-
पुढे उदय लळीत यांनीही तोच व्यवसाय निवडला.
-
मुंबईत वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर १९८३ मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली.
-
डिसेंबर १९८५ पर्यंत लळीत यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली.
-
त्यानंतर जानेवारी १९८६ मध्ये ते दिल्लीत स्थलांतरित झाले आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली केली.
-
एप्रिल २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकिलीचा दर्जा दिला.
-
सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी मध्यस्थ निरिक्षक (‘एमिकस क्युरी’) म्हणून काम केलं.
-
प्रसिद्ध २ जी स्पेक्ट्रम घोटाळा खटल्यात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती.
-
यानंतर १३ ऑगस्ट २०१४ रोजी लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.
-
आता देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून त्यांच्या नावाची शिफारस झाली आहे.
-
न्यायमूर्ती लळीत ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील. (सर्व छायाचित्र – इंडियन एक्स्प्रेस)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे