-
जम्मू काश्मीर मधील चेनाब ब्रीज जगातील सर्वात उंच सिंगल आर्च (single arch) रेल्वे ब्रीज ठरणार असून या ब्रीजचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
-
जम्मू आणि काश्मीरमधील जगातील सर्वात उंच चेनाब रेल्वे ब्रिज हा भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. या महिन्यात ब्रिजचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
-
काम पूर्ण झाल्यानंतर हा ब्रिज पॅरिसमधील आयफेल टॉवर (Eiffel Tower) पेक्षा 35 मीटर उंच असेल.
-
जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कौरी गावाजवळ सलाल धरणाच्या वरच्या बाजूला या ब्रिजचे काम सुरू आहे.
-
हा ब्रीज मुंबईस्थित पायाभूत सुविधा क्षेत्रातील अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमार्फत बांधला जात आहे.
-
गेल्या वर्षी जगातील सर्वात उंच अशा या रेल्वे ब्रीजच्या स्टील आर्चचे काम पूर्ण झाले.
-
हा ब्रीज जम्मू-उधमपूर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे.
-
या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीरमधील दुर्गम भाग देशाच्या इतर भागाशी जोडले जातील.
-
१३१५ मीटर लांबीच्या चेनाब रेल्वे ब्रीजच्या बांधकामात सुमारे ३०, ३५० मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
-
तर आर्चच्या बांधकामात १०,६२० मेट्रिक टन स्टीलचा वापर झाला आहे.
-
तसेच, १४,५०४ मेट्रिक टन स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”