-
अंबाला-कोतपुतली कॉरिडॉरच्या २२७ किमीचा महामार्ग चाचणीसाठी खुला करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाचे फोटो ट्वीटरवर शेअर केले आहे.
-
हा महामार्ग आता चाचणीसाठी खुला करण्यात आला असून हरियाणातील आठ जिल्ह्यांतील ११२ वेगवेगळ्या गावांमधून जाणार आहे.
-
नितीन गडकरींनी या महामार्गाचे फोटो ट्वीटवर शेयर केले आहेत. “जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा हे पंतप्रधान मोदी यांच्या सुशासनाचे वैशिष्ट्य आहे. अंबाला-कोतपुतली कॉरिडॉरचा पहिला टप्पा (२२७ किमी ) आता चाचणीसाठी खुला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
-
हा प्रकल्प ९५०० कोटी खर्चून विकसित करण्यात आला आहे, असे गडकरी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
-
हा महामार्ग कुरुक्षेत्र, कैथल, कर्नाल, जिंद, रोहतक, भिवानी, चरखी दादरी आणि महेंद्रगढ या जिल्ह्यांना जोडणार आहे. पुढे तो दिल्ली-जयपूर महामार्गाला जोडण्यात येणार आहे.
-
३१३ किमीचा अंबाला-कोतपुतली कॉरिडॉर सहा-लेन महामार्ग आहे. कॉरिडॉरमध्ये रस्ते अपघात टाळण्यासाठी आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात आली आहे. तसेच स्वच्छता सुविधा, ट्रॉमा सेंटर, पेट्रोल पंप, किओस्क रेस्टॉरंट, ढाबा, चिल्ड्रन्स पार्क आदी सुविधाही येथे असणार आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”