-
स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजी छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाची क्रांती होणार, असे सूचक वक्तव्य केले होते.
-
त्यांच्या या विधानानंतर संभाजी छत्रपती आपल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
-
त्यांनी ९ ऑगस्ट रोजी आपल्या समर्थकांना तुळजापूर येथे येण्याचे आवाहन केले होते.
-
दरम्यान, आज संभाजी छत्रपती यांनी आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत स्वराज्य संघटनेचे बोधचिन्ह आणि ध्वाजाचे अनावरण केले.
-
यावेळी संभाजी छत्रपतींचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
यावेळी संभाजी छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ केला.
-
याआधी राज्यसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेने पाठिंबा न दिल्यामुळे संभाजी छत्रपती यांना माघार घ्यावी लागली होती.
-
त्यानंतर संभाजी छत्रपती यांनी आपण नव्या संघटनेची सुरुवात करणार आहोत, अशी घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली होती.
-
मे महिन्यात त्यांनी स्वराज्य या संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली होती.
-
या संघटनेच्या माध्यमातून माझा हा राजकीय वाटचालीचा पाहिलाच टप्पा असल्याचे संभाजी छत्रपती म्हणाले होते.
-
संघटनेचे बोधचिन्ह काय असावे, झेंडा कसा असावा? याबाबतच्या सूचना त्यांनी जनतेला विचारल्या होत्या.
-
त्यानंतर आता संभाजी छत्रपती यांनी आज स्वराज्य या संघटनेचे बोधचिन्ह तसेच झेंड्याचे अनावरण केले.

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा