-
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार ९ ऑगस्ट रोजी पार पडला. भाजपा आणि शिंदे गटातील १८ मंत्र्यांनी शपथ घेतली.
-
याच निमित्ताने शिंदे सरकारमधील १८ मंत्र्यांच्या संपत्तीवर एक नजर टाकूया.
-
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार चंद्रकांत पाटील ५ कोटी ९९ लाख संपत्तीचे मालक आहेत.
-
शिंदे गटातील अब्दुल सत्तार (सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ) यांच्या नावावर २० कोटींची मालमत्ता आहे.
-
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तीन कोटींची संपत्ती आहे.
-
शिंदे गटातील दादासाहेब भुसे (मालेगाव विधानसभा मतदारसंघ) १० कोटी संपत्तीचे मालक आहेत.
-
भाजपाचे मंगलप्रभात लोढा या मंत्र्यांमध्ये टॉपला आहेत. त्यांच्या नावावर ४४१ कोटींची मालमत्ता आहे.
-
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावावर २४ कोटींची संपत्ती आहे.
-
भाजपा आमदार गिरीश महाजन २५ कोटी संपत्तीचे मालक आहेत.
-
नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार विजयकुमार गावित यांच्या नावावर २७ कोटींची मालमत्ता आहे.
-
शिंदे गटातील दीपक केसरकर ८२ कोटी संपत्तीचे मालक आहेत.
-
आमदार गुलाबराव पाटील यांच्या नावावर पाच कोटींची मालमत्ता आहे.
-
कल्याण येथील भाजपा आमदार रविंद्र चव्हाण नऊ कोटींचे मालक आहेत.
-
भाजपा आमदार अतुल सावे यांच्या नावावर १६ कोटींची संपत्ती आहे.
-
शिंदे गटात सामील झालेले उदय सामंत यांची एकूण संपत्ती चार कोटी इतकी आहेत.
-
आमदार संदीपान भुमरे यांच्या नावावर दोन कोटींची मालमत्ता आहे.
-
शिंदे गटातील तानाजी सावंत २०६ कोटींचे मालक आहेत.
-
आमदार शंभुराजे देसाई यांच्या नावावर १४ कोटींची संपत्ती आहे.
-
शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांची एकूण संपत्ती आठ कोटी इतकी आहे.
-
भाजपा आमदार सुरेश खाडे चार कोटींचे मालक आहेत. (सर्व फोटो : फेसबुक)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य