-
‘मी दिलेला शब्द पाळणार आहे, थोडे सबुरीने घ्या’ असे आवाहन करत नाराजांना शांत करण्याची कसरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावी लागली.
-
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी होणार हे जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील बंडावेळी मंत्रीपदाचे आश्वासन मिळालेले शिंदे गटातील अनेक आमदार आपले नाव आहे का नाही हे शोधण्यासाठी कामाला लागले.
-
मंगळवारी पहाटेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावे अंतिम करण्यात गुंतले होते. पण केवळ नऊ जणांना शिंदे गटातून शपथ देण्यात येणार असल्याने नाराजी पसरली.
-
संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर, बच्चू कडू, आशीष जयस्वाल यांना मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने ही मंडळी नाराज झाल्याचे कळते.
-
शपथविधीच्या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात नाराजीचे सावट पसरू नये यासाठी शपथविधीच्या आधी सह्याद्री अतिथिगृहावर शिंदे गटाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली.
-
सह्याद्री अतिथिगृहामध्ये झालेल्या या बैठकीस शिवसेनेतील शिंदे गटातील आमदारांबरोबरच त्यांना सहकार्य करणाऱ्या छोट्या पक्षांचे व अपक्ष आमदारही उपस्थित होते.
-
या बैठकीत आमदारांच्या नाराजीचा स्फोट झाला.
-
शपथविधीच्या कार्यक्रमावर मोठय़ा प्रमाणात नाराजीचे चावट पसरू नये यासाठी शपथविधीच्या आधी सह्याद्री अतिथिगृहावर शिंदे गटाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली.
-
महाविकास आघाडीतून बाहेर पडताना आम्हाला मंत्रीपदाचा शब्द दिला होता. पण आता डावलले जात असल्याची नाराजी अनेक आमदारांनी बोलून दाखवली.
-
छोटे पक्ष व अपक्ष यांना मंत्रीपदाची संधी द्यावी लागेल. मागच्या मंत्रिमंडळात आम्ही मंत्री होतो. आता तो आमचा अधिकार आहे, अशी भावना बच्चू कडू यांनी व्यक्त केल्याचे समजते.
-
मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होणार आहे. त्यावेळी आपल्या गटाला आणखीन दोन-तीन कॅबिनेट मंत्री पदे आणि पाच सहा राज्यमंत्रीपदे मिळणार आहेत. त्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, असं शिंदेंनी नाराज आमदारांना सांगितलं.
-
भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडाच्या सुरुवातीपासून होते. त्यांना मंत्रिपद मिळेल अशी सर्वाची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही.
-
त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गोगावले यांना आपल्या गाडीतून घेऊन जात त्यांचा सन्मान करत असल्याचा संदेश देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला
-
सर्वोच्च न्यायालयाकडून आमदार अपात्रतेच्या याचिका विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी पाठविल्या जातील आणि काही मुद्दे घटनापीठाकडे पाठविले जातील. त्यामुळे निर्णय लांबणीवर जाईल, अशी भाजपा नेत्यांना अपेक्षा आहे.
-
मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढेल आणि काही जण उद्धव ठाकरेंकडे परत फिरतील, अशी भीती भाजपा नेत्यांना वाटत असल्याचं वृत्त यापूर्वीही समोर आलं आहे.
-
याच दुहेरी अडचणीमधून वाट काढण्यासाठी सध्या छोटेखानी मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आलाय.
-
एकूणच शिंदे गटातील आमदारांमध्ये सारे काही आलबेल नाही हाच संदेश विस्तारातून गेला आहे.
-
दुसऱ्या विस्तारात समावेश न झाल्यास शिंदे गटात बंड होण्याची शक्यता वर्तविली जाते.


