-
रक्षाबंधन हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
-
बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा हा सण असल्यामुळे या सणाला मोठे महत्त्व आहे.
-
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर सुंदर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
-
या सणाला प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी सर्वात सुंदर राखी निवडण्याचा प्रयत्न करत असते.
-
भारताप्रमाणेच परदेशातही रक्षाबंधन हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो.
-
यामिनित्तने गेल्या काही आठवड्यांपासून रंगीबेरंगी राख्यांनी बाजार फुलून गेला आहे.
-
राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला प्रेमाणे मिठाई, चॉकलेट्स तसेच इतर भेटवस्तू देतो.
-
रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर बाजारात वेगवेगळ्या मिठाया आल्या आहेत.
-
नाशिकमध्ये तर चक्क सोन्याचा मुलामा असलेली मिठाई दाखल झाली आहे.
-
या मिठाईची किंमत प्रतिकिलो ६ हजार रुपये आहे.
-
महाग असली तरी लोक या मिठाईला आवडीने खरेदी करत आहेत.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख