-
माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.
-
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागपूरमधील वसंतराव देशपांडे सभागृहात सत्कार करण्यात आला.
-
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.
-
बावनकुळे यांच्याबद्दल बोलताना नितीन गडकरी यांनी जर तरच्या भाषेत नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री होऊ शकतील असं सूचक विधान विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत केलं आहे.
-
नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमामध्ये बावनकुळे यांच्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा आपल्या भाषणातून घेतला.
-
काही कार्यकर्ते मेहनत करून पुढे येतात तर काही मागच्या दारातून येतात. मात्र, बावनकुळे यांनी खूप मेहनत घेत परिश्रम केले, असं गडकरी म्हणाले.
-
पक्ष वाढविण्यासाठी ते महाराष्ट्रात फिरले. ऊर्जा खात्यात त्यांनी मोठे काम केले आहे, असंही गडकरींनी म्हटलं.
-
विजेचे कनेक्शन शेतकऱ्यांना मिळत नव्हते ते त्यांनी मिळवून दिले, अशा शब्दांमध्ये गडकरींनी बावनकुळेंचं कौतुक केलं.
-
बावनकुळे यांच्याकडे एवढे कर्तृत्व आहे की ते केव्हा माणसाला बाई आणि बाईला माणूस बनवतील हे सांगता येत नाही. म्हणजे कुठले काम कसे करायचे आणि निधी कसा मिळवायचा हे त्यांना कळतं, असं गडकरींनी आपल्या भाषणात म्हटलं.
-
याच कौशल्यामुळे त्यांनी नागपूर शहराच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधी आणला असे उद्गार गडकरींनी बावनकुळेंच्या व्यवस्थापकीय कौशल्याबद्दल बोलताना काढले. काल म्हणजेच शुक्रवारीच बावनकुळे यांनी गडकरींची त्यांच्या घरी जाऊन भेटही घेतली होती. त्यावेळी त्यांनी गडकरी पेढा भरवत असल्याचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला होता.
-
यावेळी गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्याचंही बावनकुळेंनी म्हटलं फोटो शेअर करताना म्हटलं होतं.
-
पक्षाला यश मिळविण्यासाठी त्यांनी मोठे काम केल्याचं सांगत गुडकरींनी बावनकुळेंच्या कामाचं कौतुक केलं.
-
त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली नाही. तेव्हा नाराज न होता पक्षाने त्यांना जे काम दिले ते त्यांनी प्रामाणिकपणे केले, अशा शब्दांमध्ये गडकरींनी बावनकुळेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं.
-
त्यांच्या जागेवर ज्याला उमेदवारी दिली त्याला निवडून आणले. बावनकुळे कार्यकर्त्यांमध्ये नेहमी लोकप्रिय राहिले, असेही गडकरी म्हणाले.
-
बावनकुळे हे मेहनती आहे. प्रदेशाध्यक्षपद हे मोठे पद आहे आणि हे पद मिळाल्यानंतर काय होते हे माहित आहे, असं गडकरी यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
-
पुढे गडकरींनी थेट देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत बावनकुळेंचं नाव घेऊन मुख्यमंत्रीपदासंदर्भात भाष्य केलं.
-
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस होतील पण, कदाचित फडणवीस दिल्लीत गेले तर बावनकुळेंना संधी असल्याचे सूचक वक्तव्य यावेळी गडकरी यांनी केले.
-
“चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असे मी म्हणणार नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे,” असं विधान गडकरींनी केलं आहे.
Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…