-
सध्या आघाडीवर असलेल्या सात कंपन्यांची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी झालेली आहे.
-
यामध्ये पहिल्या क्रमांकावर टाटा ग्रुपचे नाव येते. टाटा ग्रुपची सुरुवात १८६८ साली करण्यात आली होती.
-
आयटी, धातू, ऑटो क्षेत्रात टाटा ग्रुपचा मोठा व्यवसाय आहे. याबरोबरच अन्य अनेक क्षेत्रात या ग्रुपचे काम आहे.
-
ब्रिटानिया ग्रुपचीदेखील भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्थापना झालेली आहे. हा उद्योग समूह कोलकाता येथील वाडिया परिवाराशी निगडित आहे.
-
१८९३ साली खाद्य क्षेत्रात अग्रेसल असलेल्या या उद्योग समुहाची स्थापना करण्यात आली होती.
-
सध्या या उद्योग समुहाची उलाढाल ११ हजार ८७८ कोटी रुपये आहे. ब्रिटानिया ग्रुपकडून बिस्किटांसोबतच अन्य खाद्यपदार्थ बनवले जातात.
-
बिरला उद्योग समूह हादेखील खूप जुना उद्योग समूह आहे. या समुहाची स्थापना १८५७ साली झाली होती.
-
घनश्याम दास बिरला यांचे आजोब शेठ शिव नारायण बिरला यांनी या समुहाची स्थापना केली होती.
-
आज या उद्योग समुहाचा व्यापार ३६ देशांपर्यंत पसरलेला आहे.
-
गोदरेज उद्योग समूह हादेखील स्वातंत्र्यापूर्वी १८९७ साली स्थापन झालेला आहे.
-
या समुहाचा मेटल, इलेक्ट्रॉनिक्स तसेच रिअॅलिटी क्षेत्रात उद्योग आहे. अर्देशीर गोदरेज, पिरोजशा बुर्जोर्जी गोदरेज यांनी या उद्योग समुहाची स्थापना केली होती.
-
दुचाकींचे उत्पादन घेणाऱ्या टीव्हीएस उद्योग समुहाची स्थापना १९११ साली सुंदरम अयंगर यांनी केली होती.
-
या उद्योग समुहाचे मुख्यालय चेन्नई येथे असून ऑटो, इलोक्ट्रॉनिक क्षेत्रात काम आहे.
-
डाबर कंपनीची सुरुवात १८८४ साली डॉ. एसके बर्मन यांनी सुरू केली होती. नैसर्गिक उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे डाबरचा उद्योग समुहाचा व्यवसाय वाढत जात आहे.
-
आज कंपनीचा व्यवसाय आरोग्यसेवा, आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये असून उलाढाल 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
-
रेमंड कंपनीची सुरुवात १९२५ साली झाली होती. विजयपत सिंघानिया यांनी या कंपनीची स्थापना केली होती.
-
आज या कंपनीचे शोरूम केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहेत.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख