-
मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोर धरला आहे. (सर्व फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्स्प्रेस)
-
सध्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरुपात पावसाच्या सरी बरसत आहेत.
-
मुंबई शहर तसेच उपनगरांतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
-
आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे नोकरदारांची धावपळ उडाली.
-
नवी मुंबईतदेखील जोरदार सरी बरसल्या. येथे रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले होते.
-
नवी मुंबईतील सानपाडा परिसरात तर रस्त्यांचे रुपांतर नदीत झाले होते. येथे गुडघ्यापर्यंत पाणी चालले होते.
-
सर्वदूर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला पाहाया मिळाला.
-
दरम्यान, सध्या मुंबई तसेच उपनगरांत पावसाने जोर धरला असून आगामी काही दिवस असाच पाऊस राहण्याची शक्यता आहे.
-
सध्या हवामान खात्याने रायगड, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
-
तर धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच