-
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी आरपीआयमधील फूट, पक्ष चिन्हावर निवडणूक आयोगाची भूमिका ते शिवसेनेतील बंडखोरी अशा विविध विषयांवर मोठी वक्तव्य केली आहेत.
-
मंगळवारी (१६ ऑगस्ट) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना आठवलेंनी केलेल्या याच वक्तव्यांचा हा आढावा.
-
१. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे. लवकरच याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वीचे निकाल पाहिले तर तसेच दिसतात – रामदास आठवले
-
२. आमच्या पक्षात एकदा फूट पडली होती. आर. एस. गवई, जोगेंद्र कवाडे आणि मी असे तिघेजण एकत्र होतो – रामदास आठवले
-
३. आरपीआयमध्ये त्यावेळी कुणाला पाठिंबा द्यायचा यावरून आमच्यात वाद झाला होता. मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलो आणि गवई व कवाडे काँग्रेससोबत गेले – रामदास आठवले
-
४. आमचा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. त्यावेळी दोन खासदार गवईंच्या बाजूने असल्याने आमच्या पक्षाचं ‘उगवता सूर्य’ चिन्ह गवईंना मिळालं होतं – रामदास आठवले
-
५. आरपीआय पक्ष फुटला तेव्हा माझ्या बाजूने संपूर्ण पक्ष होता, तरी आम्हाला पक्षाचं चिन्ह मिळालं नव्हतं – रामदास आठवले
-
६. आता शिवसेनेत २/३ पेक्षा अधिक आमदार व खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांनाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल,” असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं – रामदास आठवले
-
७. उद्धव ठाकरे यांच्याकडे १५ आमदार आहेत. सहा खासदार आहेत. त्यामुळे त्यांनाही मान्यता मिळेल, मात्र दुसरं पक्षचिन्ह घ्यावं लागेल. धनुष्यबाणावर एकनाथ शिंदेंचाच हक्क आहे,” असंही आठवलेंनी नमूद केलं – रामदास आठवले
-
८. मोदींविरोधात कोणताही एक चेहरा चालणार नाही. मोदींचा चेहरा इतका मजबूत आहे की तिथं दुसरे चेहरे चालणारच नाही – रामदास आठवले
-
९. नितीशकुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार असे अनेक चेहरे मोदींसमोर असले तरी त्याला घाबरण्याचं कारण नाही – रामदास आठवले
-
१०. मी मोदींच्या पाठिशी असल्यानंतर त्यांना चिंता करण्याची आवश्यकता अजिबात नाही. २०२४ मध्ये आम्ही ४०० पेक्षा अधिक जागांवर निवडून येऊ – रामदास आठवले

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO