-
माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी शिवसेनेला धक्का दिला आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर गेली अनेक वर्षे वरळीतील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करीत होते.
-
मात्र न्यायालयाने १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या थरामध्ये मज्जाव केल्यानंतर सचिन अहिर यांनी हा उत्सव बंद केला.
-
विधानसभेच्या मागील निवडणुकीत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली.
-
निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वरळी परिसरात विकासकामांचा धडाका लावला होता.
-
वरळी परिसरातील माजी आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले सचिन अहिर यांची आमदार म्हणून विधान परिषदेवर वर्णी लागली.
-
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपद भूषविले होते.
-
त्यामुळे या परिसराला शिवसेनेचा एक खासदार, तीन आमदार लाभले आहेत.
-
माजी महापौर किशोरी पेडणेकर याच परिसरातील प्रभागातून विजयी झाल्या होत्या.
-
तसेच याच परिसरातील माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर यांच्या पदरात बेस्ट समितीचे अध्यक्षपद पडले होते.
-
शिवसेनेची ही मातब्बर मंडळी असतानाही दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने भाजपाने वरळी परिसरात मुसंडी मारली आहे.
-
जांबोरी मैदान आरक्षित झाले नसल्याचे हेरून भाजपने १०-१२ दिवसांपूर्वी ते आरक्षित केले.
-
मुंबई भाजप अध्यक्षपदी अॅड. आशीष शेलार यांची नियुक्ती नुकतीच झाली असून त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
-
त्यामुळे त्यांनी आधीच भाजप पदाधिकारी संतोष पांडे यांना सूचना देऊन मैदानाचे आरक्षण करून दहीहंडीचे आयोजन केले.
-
आम्ही मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि अन्य सर्व परवानग्या मिळविल्या आहेत, असे पांडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
-
सचिन अहिर यांची दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येत होती.
-
भाजपा दहीहंडीसाठी किती लाखांची पारितोषिके देणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
-
महापालिकेतील भ्रष्टाचारमुक्तीची ही दहीहंडी असल्याने आम्ही बक्षिसाची रक्कम अद्याप ठरविलेली नाही, मात्र ती फोडणाऱ्या गोविंदांचा यथोचित सन्मान केला जाईल.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ भाजपा नेते या दहीहंडीसाठी येणार असल्याची माहिती पांडे यांनी दिली.
-
भाजपाने यंदा मुंबईत ३५० हून अधिक दहीहंड्यांचे आयोजन केले असून मुंबई भाजपने २२७ हून अधिक गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरविला आहे.
-
याखेरीज मुंबईतील भाजप नेत्यांनी वैयक्तिक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी सांगितले.
-
(सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती