-
आज सकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यातीव श्रीवर्धन येथे एक संशयास्पद बोट आढळली आहे. असून या बोटीत तीन एके-४७ आढळल्या आहेत. तसेच काही कागदपत्रेही आढळली आहेत.
-
हरिहरेश्वर येथेही एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी रायगड जिल्ह्यात हायअलर्ट घोषित केला आहे.
-
या बोटींमध्ये तीन एके-४७ आढळल्या आहेत. तसेच २०० ते २२५ जिवंत काडतूसही आढळून आली आहे.
-
सकाळच्या सुमारास स्थानिकांना ही बोट आढळून आली. त्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, बोटीचा पाहणी केली असता, या बोटीत ३ एके-४७ रायफल आणि काडतूस तसेच बोटीची कागदपत्रे आढळून आली.
-
दरम्यान, या घटनेबाबत चिंता व्यक्त करत आमदार आदिती तटकरे यांनी याघटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.
-
या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली आहे. ”ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची असून बोटीचे इंजिन बिघडल्याने ती रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर तरंगत आली”, असे ते म्हणाले.
-
”आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या बोटीचे नाव लेडीहान असून ती एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची आहे. हाना लॉडर्सगन असं या ऑस्ट्रेलियन नागरिकाचे नाव आहे. ती एक महिला असून तिचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान आहेत.
-
ही बोट मस्कटहून युरोपकडे जाणार होती. मात्र, बोटीचे इंजिन बिघडल्याने बोटीवरील सर्वांना रेस्क्यू करण्यात आले. तसेच समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नाही.
-
त्यामुळे समुद्राच्या प्रवाहाने ती बोट रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आली”, अशी माहिती देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
-
या घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवादविरोधी पथक करीत असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.
-
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांकडून हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. राज्यात ठिकठिकाणी गाड्याची चेकिंग करण्यात येत आहे.
-
पुण्यातही पोलिसांकडून वाहनचालकांच्या गाड्यामध्ये कोणत्या वस्तू आहेत. त्याबाबत तपासणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत दहीहंडी आणि गणपती उत्सव आहे. त्यापूर्वी ही संशयास्पद बोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…